विश्वासच बसणार नाही हे भारतातच घडलं, कर्मचाऱ्यांना दिली पगारी सुट्टी


नवी दिल्ली : किती आनंद होतो, जेव्हा एखादी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सांगते… जा जी ले अपनी जिंदगी. असाच काहीस आनंद सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोच्या कर्मचाऱ्यांना होत असेल कारण कंपनीने अशीच एक घोषणा केली आहे.

काळानुसार लोकांची काम करण्याची पद्धत बदलत आहे. विशेषत: नवीन युगातील कंपन्या कार्यालयीन वातावरण आणि कार्यसंस्कृती बदलण्यात मोठा हातभार लावत आहेत. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भेटवस्तू किंवा कंपनीचे शेअर्स देण्याची प्रथा आता जुनी झाली आहे. आता कंपन्यांनी यापेक्षा वेगळे काही करायला सुरुवात केली आहे. स्टार्टअप कंपनी मीशोने आपल्या कर्मचाऱ्यांना सणासुदीनंतर ११ दिवसांचा ब्रेक देण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून ते चांगले जीवन जगातील आणि तणावमुक्त राहू शकतील.

सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक मिळणार
मीशो या कंपनीने या ११ दिवसांच्या ब्रेकला ‘रीसेट आणि रिचार्ज ब्रेक’ असे नाव दिले आहे. कंपनीने यापूर्वीही असे केले आहे आणि मीशोच्या कर्मचाऱ्यांना ब्रेक मिळण्याचे हे सलग दुसरे वर्ष असेल. हा ब्रेक सणासुदीनंतर २२ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि १ नोव्हेंबरपर्यंत चालेल. कंपनीने म्हटले की उद्योग जगतात हे प्रथमच घडत आहे आणि मीशोच्या कर्मचार्‍यांना सणासुदीच्या व्यस्त कालावधीनंतर कामापासून पूर्णपणे दूर राहून मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.

कंपनीच्या सीईओनीं काय म्हटले?
मीशोचे संस्थापक आणि सीईओ संजीव बर्नवेल यांनी ट्विट केले की, “अंतराळवीरांनाही विश्रांतीची गरज आहे, त्याचप्रमाणे कंपनीच्या मोठ्या मोहिमेवर काम करणाऱ्या लोकांनाही विश्रांतीची गरज आहे. सलग दुसय्रा वर्षी मीशोचे कर्मचारी ११ दिवस कामावरून स्वतःला अनप्लग करतील (सुट्टी घेतील) आणि सणासुदीच्या हंगामानंतर स्वतःला रीसेट आणि रिचार्ज करतील. काम महत्वाचे आहे पण आरोग्य अमूल्य आहे.”

कर्मचाऱ्यांना असेट
सीईओ अत्रे यांच्या पोस्टवर टिप्पणी करताना, मीशोने ट्विट केले, “सणाच्या काळात वार्षिक सुट्टी, आम्ही असे काम करतो.” कंपनी म्हणते की ११ दिवसांचा ब्रेक हा “कर्मचारी-केंद्रित कार्यस्थळाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, जे खरोखरच सर्वात मोठी मालमत्ता, त्याच्या कर्मचार्‍यांची काळजी घेते”. मीशोने यापूर्वी “सीमाविरहित” कार्यस्थळाचे मॉडेल, ज्यामध्ये असीम आरोग्य रजा, ३० आठवड्याची लिंग-तटस्थ पालक रजा तसेच ३०-दिवसांची लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी रजा जाहीर केली होती.

तुम्हाला हवे ते करा!
मिशोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी आशिष कुमार सिंग म्हणाले की, चांगली कंपनी संस्कृती निर्माण करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी काम-जीवन संतुलन, विश्रांती आणि कायाकल्प आवश्यक आहे हे मान्य करणे आवश्यक आहे. हेच आम्ही ‘रीसेट अँड रिचार्ज’ द्वारे करत आहोत आणि कामाच्या ठिकाणी पारंपारिक संकल्पना पुन्हा परिभाषित करत आहोत. ते म्हणाले की, ब्रेक दरम्यान कर्मचारी त्यांचे हवे ते करू शकतात. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवू शकतात किंवा नवीन काही शिकू शकतात किंवा कुठेतरी फिरायला जाऊ शकतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: