भुवनेश्वरला ट्रोल करणाऱ्यांना पत्नीने लगावली सणसणीत चपराक; म्हणाली, आजकल लोकांना…


नवी दिल्ली: भारतीय संघातील स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर देखील तो ट्रोल होतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भुवीची तुफान धुलाई झाली होती. त्याच्या १९व्या षटकातील खराब गोलंदाजीमुळे भारताचा पराभव झाला. यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले गेले.

अखेरच्या म्हणजे डेथ ओव्हरमध्ये भरपुर धावा देण्याची भुवीची ही पहिली वेळ नाही. याआधीच्या ३ सामन्यात त्याने अशीच खराब गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर सर्वांनी त्याच्यावर टीका केली. अशाच भुवीची पत्नी नुपूर नागर त्याच्या समर्थनासाठी समोर आली आहे. भुवीवर टीका करणाऱ्यांना नुपूरने सडतोड उत्तर दिले आहे.

वाचा- क्रिकेटमध्ये २३ वर्षानंतर असे घडले; भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये इतिहास घडवला

नुपूरने इस्टाग्रामवर एक स्टोरी लिहली असून त्यात लोकांकडे फालतूचा वेळ फार आहे. लोकं अगदीच रिकमे आहेत, त्यांच्याकडे नकारात्मकता पसरवण्याशिवाय दुसरे काही काम नाही. इतकच नाही तर नुपूरने टीकाकारांना त्याच्या वेळेचा चांगला उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा- निवृत्तीनंतर काय करणार रॉजर फेडरर, केला मोठा खुलासा; देशासाठी करणार हे काम

काय म्हटलंय पोस्टमध्ये…

आजकल लोकांना काही कामंच नाहीत. लोक इतके मोकळे आहेत की त्यांना भरपुर वेळ आहे. माझ्या सल्ल्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही. पण तुमच्या बोलण्यामुळे देखील फरक पडत नाही. त्यामुळे हा वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी वापरा, अर्थात तुमच्याकडून अशा गोष्टी होण्याची शक्यता फार कमी आहे, असे नुपूरने म्हटले आहे.

गेल्या काही सामन्यात भुवीने डेथ ओव्हर्समध्ये फार धावा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यातील १९व्या षटकात त्याने १६ धावा दिल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला २०९ धावांचे लक्ष्य पार करता आले.

वाचा- पराभवानंतर हताश रोहित शर्माने दिला गंभीर इशारा; टी-२० वर्ल्डकपच्या आधी सुधारा नाही तर…

भुवीच्या गोलंदाजीवर फक्त चाहत्यांनी नाही तर माजी क्रिकेटपटूंनी देखील जोरदार टीका केली आहे. माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले, जेव्हा जेव्हा भुवीला गोलंदाजी दिली जाते तेव्हा तेव्हा तो धावा देत सुटला आहे. त्याने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यात १८ चेंडूत (१९वे षटक) ४९ धावा दिल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर तो ३ धावा देतोय. त्याच्या सारख्या अनुभवी आणि क्षमता असलेल्या गोलंदाजाकडून आपण आपेक्षा ठेवतो. हा काळजीचा विषय आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: