सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीच्या देशभरातील ग्राहकांसाठीच्या लकी ड्रॉ सोडतीत समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक मानकरी

  • सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीकडून देशभरातील ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सोडत
  • समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक ठरले मानकरी

पंढरपूर / प्रतिनिधी – सोनालिका ट्रॅक्टर कंपनी च्यावतीने जुन 2022 या महिन्यामध्ये देशभरातून ट्रॅक्टर खरेदी करणार्‍या खरेदीदारांमधून लकी ड्रॉ चे आयोजन केेले होते. त्यानुसार बुधवार दि.21 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने लकी ड्रॉ ची सोडत काढण्यात आली. यामध्ये समृध्दी ट्रॅक्टर्स पंढरपूरच्या सांगोला शाखेतील तीन ग्राहक सोडतीचे मानकरी ठरले असुन त्यांना सोन्याचे बक्षीस मिळाले आहे.

अमरजीत पाटील

झालेल्या सोडतीमध्ये सांगोला तालुक्यातील सुरेखा बाजीराव गायकवाड आणि बामणी येथील गजानन अंकुश उबाळे यांना प्रत्येकी 20 ग्रॅम सोने तर बाळा श्रीरंग मुळे यांना 1 ग्रॅम सोने असे समृध्दी ट्रॅक्टर्सचे तीन ग्राहक बक्षीसाचे मानकरी ठरले आहेत.

सांगोला शाखेच्या वतीने चालू सप्टेंबर महिन्या करीता खरेदीदारांसाठी समृध्दी ट्रॅक्टर्सच्या वतीने प्रति 10 ग्राहकांमधून लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉ मध्ये बंडु रघुनाथ साळुंखे रा.पारे.ता.सांगोला यांना पहिले बक्षीस मोटारसायकल मिळाली आहे. पाचेगाव ता.सांगोला येथील बाळासाहेब राजाराम मिसाळ यांना द्वितीय क्रमांकाचे सोलर वॉटर हीटर तर तिसर्‍या क्रमांकाचे आटाचक्की हे बक्षीस प्रभाकर मारुती वाघमारे यांना मिळाले आहे. यातील उत्तेजर्नाथ मानकरी ग्राहकांना विशेष गिफ्ट देण्यात आले आहे.

या सोडतीच्या वेळी सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीचे बलजींदर सिसोदिया, सुबोध शर्मा, सचिन दराडे, ओमप्रकाश दुधाटे, धाराशीव साखर कारखान्याचे संचालक अभिजीत कदम, मॅनेजर सोमनाथ केसकर, बाळासो मोरे, राजेंद्र जगताप, हरी डुबल, हणमंत कोरे यांच्यासह शेतकरी बांधव आणि कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: