IND vs AUS : दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली, रोहित शर्माने उचलले मोठे पाऊल


नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना शुक्रवारी नागपूरमध्ये होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढलेली आहे. कारण या सामन्याच्या एक दिवस आधी रोहित शर्माने एक मोठे पाऊस उचलल्याचे समोर आले आहे.

भारताला आशिया चषकात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने २०८ धावा केल्या, पण तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाची चिंता आता वाढलेली आहे. जर दोनशे धावा करूनही संघ पराभूत होत असेल, तर काय करायचे, हा मोठा प्रश्न आता भारतीय संघापुढे असेल. त्यासाठीच आता कर्णधार रोहित शर्माने मोठे पाऊल उचलले आहे.

भारताचा दुसरा सामना शुक्रवारी होणार आहे. पण त्यापूर्वी गुरुवारी रोहितने भारतीय संघाची एक आपातकालीन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी आपली मतं व्यक्त केली. या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचचा विषय होता तो गोलंदाजीचा. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारताला गोलंदाजीमुळेच सामने गमवावे लागले आहे. आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे आता भारताची गोलंदाजी कशी असायला हवी, त्यामध्ये नेमके कोणते बदल व्हायला हवेत आणि कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे. याबाबत रोहित आणि द्रविड यांनी आपली मतं व्यक्त केली. यावेळी भारतीय संघातील जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युजवेंद्र चहल यांना यावेळी खास मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर आता रणनिती नेमकी कशी असावी, याबाबत चर्चा करण्यात आली.

वाचा-भारताच्या हातून सामना कसा निसटला, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडने सांगितलं रहस्य

भारताने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीत नेमक्या कोणत्या चुका केल्या आणि त्याचा कसा फटका बसला, हे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे आता भारताच्या गोलंदाजीमध्ये लक्षणीय बदल आपल्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहायला मिळू शकतो. कारण आता ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी फार कमी दिवस राहीले आहेत आणि आता प्रयोग करून चालणार नाही. त्यामुळे आता विश्वचषकाची रणनिती या दुसऱ्या सामन्यापासून अंमलात आणायची तयारी सुरु झाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: