पुणे परिसरात घरफोडया करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळयात

  • पुणे शहर व परिसरात घरफोडया करणारा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळयात
  • सराईत गुन्हेगारांकडून १८० ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर असा १० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे – फिर्यादी यशवंत बाळकृष्ण कुलकर्णी वय ६८ वर्षे यांनी त्यांच्या फ्लॅट नंबर ४०१ व ४०२, बी विंग हिल क्रेस्ट,सोसा. डावी भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे यांचे रहाते घरामध्ये दि. २०/०७/२०२२ रोजी झालेल्या घरफोडी चोरीत सोन्याचे दागिने चोरी झालेबाबत तक्रार दिल्याने कोथरूड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १६० / २०२२ भादंविक ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे यांनी दोन तपास पथके तयार केली होती.

या पथकांच्या मदतीने घरफोडीच्या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा ३ कडील स.पो.फौ.संतोष क्षिरसागर व पो.शि. ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या बातमीवरून अट्टल घरफोडी करणारा पोलीस रेकॉर्डवरील शिकलगरी आरोपी नामे संगतसिंग अजिमिरसिंग कल्याणी रा.रामटेकडी हडपसर पुणे व थेऊर, ता-हवेली, जि.पुणे व त्याचा साथीदार युवराज वसंत मोहिते वय ३४ वर्षे रा.मु.पो.तोंडोली ता. कडेगाव जि. सांगली हे डुक्कर खिड, वंडर फ्युचर बिल्डींगचे समोर कोथरुड पुणे येथे त्याच्या साथीदाराला भेटण्यास येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच सदर ठिकाणी सापळा लावला असता रेकॉर्डवरील आरोपी युवराज वसंत मोहिते वय ३४ वर्षे रा.मु. पो. तोंडोली ता. कडेगाव जि.सांगली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने त्याचा साथीदार संगतसिंग अजिमिरसिंग कल्याणी, रा. रामटेकडी हडपसर पुणे व थेऊर ता-हवेली जि. पुणे याचेसह मिळून पुणे शहर व परिसरात घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यांचेकडून एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.आरोपीकडून १८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दानिगे. १७२ ग्रॅम चांदीचे दागिने, दोन मोटर सायकल असा मिळून एकुण १०,०५,३२०/- रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच संगतसिंग अजिमिरसिंग कल्याणी,रा.रामटेकडी हडपसर, पुणे व थेऊर, ता-हवेली, जि.पुणे हा फरार आहे.

सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे व गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे,पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील,पोलीस उप-निरीक्षक राहुल पवार,अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते,सुजित पवार,किरण पवार,संजीव कळवे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे,साईनाथ पाटील,गणेश शिंदे, प्रकाश कट्टे,दिपक क्षिरसागर,सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: