लोहार समाज संघटित करण्या साठी लोहार समाज युवा मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना

  • लोहार समाजाने लावला महाराष्ट्रातील पहिला भगवा झेंडा

पंढरपूर / संतोष कांबळे : महाराष्ट्रामध्ये अठरापगड जातींमध्ये लोहार हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच युद्ध साधनसामुग्री बनवण्यापासून ते आजतागायत शेतकऱ्यांना शेतामध्ये लागणाऱ्या प्रत्येक लोखंडी वस्तू तसेच वेगवेगळे साधनसामग्री बनवण्यामध्ये कायमच पुढे राहिला आहे. परंतु याच समाजाला घटनेतील तरतुदीनुसार शासन स्तरावर आर्थिकदृष्ट्या तसेच शैक्षणिकदृष्ट्या पाहिजे त्याप्रमाणात विकास झालेला नाही. त्यामुळे हा समाज मूळ प्रवाहापासून अजूनही मागे आहे याचा विचार करत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील खेडोपाड्यात लोहार समाज संघटित करण्यासाठी लोहार समाज युवा मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष सुहास अंकुश लोहार यांनी समाजाची मोट बांधण्याचे ठरवले आहे.

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे लोहार समाज युवा मंडळ शाखेचे उद्घाटन झाले आणि भगवा झेंडा फडकवण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंढरपूर तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक व उद्घाटक सुहास अंकुश लोहार होते.

यावेळी खर्डी गाव व पंचक्रोशीतील लोहार, सुतार, सोनार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. खर्डी ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश हाके, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चव्हाण, संतोष पाटील, उत्तम पाटील, सत्यवान फाळके, माजी सदस्य बंडू रणदिवे, शहाजी कांबळे, पत्रकार संतोष कांबळे, भगवान सव्वाशे, चंदू लवटे उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी लोहार समाजाविषयी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.यावेळी लोहार समाज युवा मंडळ शाखा खर्डी या शाखेच्या अध्यक्षपदी आकाश टिंगरे, उपाध्यक्षपदी राजेंद्र कावरे, सचिव अशोक सुतार, सहसचिव बालाजी टिंगरे, खजिनदार गोरख पवार, शाखाप्रमुख समाधान पोफळे, तसेच सदस्य म्हणून निखिल पवार, तानाजी लोहार, समाधान मोरे, अमोल लोहार, दीपक कावरे, गणेश पवार, दिनेश गावडे, विनोद तोरणे, काशिनाथ पवार, रवी कावरे, पंकज पंडित, विकास पवार, अजय पवार, राजू पवार यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद तोरणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: