रोहित शर्मा फलंदाजीमध्ये सतत अपयशी का ठरतोय, जाणून घ्या हे सर्वात मोठं कारण…


मुंबई : रोहित शर्मा हा एकेकाळी रनमिशन म्हणून ओळखला जायचा. पण सध्याच्या घडीला रोहितला फलंदाजीत सातत्य राखता आलेले नाही, रोहित हा फलंदाजीत अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी ही चिंतेची बाब आहे. पण रोहित हा फलंदाजीत नेमका का अपयशी ठरत आहे, याचे कारणही आता समोर आले आहे.

रोहित हा सध्या फक्त ट्वेन्टी-२० सामन्यांवर लक्ष केंद्रीत करून आहे. पण गेल्या १० ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये रोहितला २६९ धावा करता आल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी ही प्रत्येक सामन्याला जवळपास २७ एवढी आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये रोहितची बॅट तळपली नव्हती. त्यानंतर आशिया चषकातही रोहितकडून सातत्यपूर्ण फलंदाजी पाहता आली नव्हती. पण रोहित हा सातत्याने धावा करण्यात का अपयशी ठरत आहे, याचे कारणही समोर आले आहे.

सर्वात पहिला गोष्ट म्हणजे रोहितने गेल्या काही दिवसांमध्ये आपली फलंदाजीची शैली बदलली आहे. रोहित हा मैदानात उतरल्यावर लगेचच आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज नक्कीच नाही. रोहित हा स्थिरस्थावर झाल्यावर मोठी खेळी साकारतो, हे आतापर्यंत सर्वांनीच पाहिले आहे. पण सध्याच्या घडीला रोहित आला खेळायला आल्यावर लगेच मोठे फटके मारायला जातो. एखाद-दुसरे त्याचे मोठे फटके लागतातही, पण त्याची ही खेळी अल्पजीवी ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितने धावांची तिशीही ओलांडलीही नाही. त्यामुळे रोहितसाठी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे रोहितला जर यापुढे मोठी खेळी साकारायची असेल आणि फलंदाजीत सातत्य ठेवायचे असेल तर त्याला आपली जुनीच आणि नैर्सगीक शैलीच कायम ठेवावी लागेल.

गेल्या १० सामन्यांचा विचार केला तर रोहितला दोन अर्धशतकं पूर्ण करता आली आहेत. रोहितने ६४ धावांची खेळी हा वेस्ट इंडिजविरुद्ध साकारली होती. त्यानंतर आशिया चषकातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ७२ धावा केल्या होत्या. पण अन्य आठ डावांमध्ये मात्र त्याला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाची चिंता आता वाढलेली असेल. पण रोहित हा एक व्यावसायिक खेळाडू आहे. त्यामुळे आपल्याकडून नेमक्या कोणत्या चुका होत आहेत, हे त्याला कदाचित आतापर्यंत समजले असेल. त्याचबरोबर संघात राहुल द्रविडसारखे मुख्य प्रशिक्षक आहेत, तेदेखील नक्कीच या गोष्टीचा विचार करतील. कारण विश्वचषकात रोहित हा फॉर्मात येणे सर्वात गरजेची आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: