शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरेंना मेळाव्यासाठी परवानगी

  • शिवाजी पार्कवर सेनेच्या मेळाव्याला परवानगी मिळाल्याने पंढरपूर येथे शिवसेनेकडून आनंदोत्सव

पंढरपूर/ प्रतिनिधी – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हापासून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोर्टाने उद्धव ठाकरेंना येत्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिल्या मुळे येत्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच आवाज असणार आहे . कोर्टाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा दिलासा देणारा आहे .आज उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस आहे . त्यामुळे शिवाजी पार्कवर सेनेच्या मेळाव्याला परवानगी मिळाल्याने रश्मी ठाकरेंचा वाढदिवस उध्दव ठाकरे आणि शिवसेने साठी खास ठरल्याची चर्चा आहे .

शिवाजी पार्कवर सेनेच्या मेळाव्याला परवानगी मिळाल्याने आज पंढरपूर येथे शिवसेनेकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे , शिवसेना किशोर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, शाखाप्रमुख प्रणित पवार, विभाग प्रमुख उमेश बापू काळे, कैलास नवले, स्वप्निल शिंदे, अनिल कसबे ,बंडू घोडके, संजय पवार ,अक्षय आठवले, अक्षय पोद्दार, प्रशांत बागडे,अमर आवताडे, विजय गंगणे, किरण शिकलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा आनंदोत्सव साजरा करताना शिवसेनेच्यावतीने पेढे वाटण्यात आले आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: