आयकर अधिकारी दीड वर्ष कामावर गैरहजर; पथक घरी पोहोचलं; कुटुंब कुजलेल्या प्रेतासोबत राहत होतं


कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबानं आयकर अधिकाऱ्याचा मृतदेह घरात ठेवला होता. आयकर अधिकारी जिवंत आहे, तो कोमामध्ये असल्याचं कुटुंबाला वाटत होतं. मुख्य वैद्यकीय पथक शुक्रवारी मृताच्या घरी पोहोचलं. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. वैद्यकीय पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन हॅलट रुग्णालयात पाठवला.

रावतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कृष्णापुरी परिसरात वास्तव्यास असलेले विमलेश कुमार आयकर विभागात एओ पदावर कार्यरत होते. करोना काळात ते आजारी पडले. त्यांची प्रकृती गंभीर होती. कुटुंबियांनी १९ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. २२ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयानं मृत्यू प्रमाणपत्र दिलं. मात्र कुटुंबाचा विश्वास बसत नव्हता. ते दुसऱ्या रुग्णालयात गेले. तिथल्या डॉक्टरांनीदेखील विमलेश यांना मृत घोषित केलं.
रिसेप्शनिस्ट रिसॉर्टच्या कस्टमरकडे जाईना; भाजप नेत्याच्या मुलानं निर्घृणपणे संपवलं
विमलेश यांचं पार्थिव घेऊन कुटुंबीय घरी आले. अंत्यसंस्कारांची तयारी सुरू झाली. तेव्हा पत्नी मिताली यांनी विमलेश यांच्या हृदयाचे ठोके सुरू असून ते कोमात असल्याचं सांगितलं. यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. मृतदेह घरातच ठेवण्यात आला. विमलेश जिवंत असल्याचा विश्वास पत्नी आणि कुटुंबाला होता. विमलेश यांच्या मृतदेहावर कुटुंब दररोज गंगाजल शिंपडत होता. मात्र मृतदेह खराब होऊ लागला.

विमलेश कुमार गेल्या दीड वर्षांपासून कामाला गेले नव्हते. ते जिवंत असल्याचा कुटुंबाचा दावा होता. त्यामुळे आयकर विभागाला अंतिम अहवाल तयार करता येत नव्हता. आयकर विभागाकडून कानपूर डीएमना पत्र लिहिण्यात आलं. एओ अधिकाऱ्याच्या मृत्यूचा तपास करण्याची विनंती करण्यात आली. यानंतर डीएमनी कानपूर सीएमओ आलोक रंजन यांना पत्र लिहून तपासाचे आदेश दिले.
लग्नाच्या १२ वर्षानंतर पूजा म्हणाली, माझं नाव हसीना बानो! नवऱ्याला धक्का बसला अन् मग…
सीएमओ आलोक रंजन यांनी डेप्युटी सीएमओ डॉ. गौतम यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यांचं पथक तयार केलं. शुक्रवारी पथक विमलेश कुमार यांच्या घरी पोहोचलं. मात्र कुटुंबीयांनी विमलेश यांचा मृतदेह नेऊ देत नव्हते. त्यामुळे पोलीस मागवण्यात आले. विमलेश यांच्या पत्नीची मानसिक स्थिती ढासळली असल्याचं समजतं. मृतदेहाला केमिकल लावण्यात आल्याचं डेप्युटी सीएमओंनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: