त्रिसूत्रीचा सर्वांनी अंगिकार करुन आपले ह्रदय निरोगी ठेवा – डॉ.प्रसन्न भातलवंडे

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक ह्रदय दिन साजरा
 पंढरपूर दि.30/09/2021 :-ह्रदयाशी संबधित आजाराबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक ह्रदय दिन म्हणून साजरा केला जातो.योग्य आहार, नियमित व्यायाम व तणावरहित जीवनशैली ही निरोगी ह्रदयसाठी त्रिसूत्री असून, या त्रिसूत्रीचा सर्वांनी अंगिकार करुन आपले ह्रदय निरोगी ठेवा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रसन्न भातलवंडे यांनी केले आहे.   

  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले व वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांच्या मार्गदर्शनाखली उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे जागतिक ह्रदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोसले, डॉ.आबासाहेब गायकवाड, डॉ. धनंजय सरोदे,आहारतज्ञ वाघमारे आणि उपजिल्हा रुग्‍णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

    ताणतणाव , चुकीचा आहार,आरामदायी जीवनशैली यामुळे समाजात ह्रदय विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ह्रदय विकार संबधित आजाराची लक्षणे आढळल्यास पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथ्रमिक तपासण्या व उपचार करण्यात येतात. उपजिल्हा रुग्णालयांत तपासणी झालेल्या रुग्णांना आवश्यक उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जोडण्यात आलेल्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते.या योजनेतंर्गत ॲन्जीओग्राफी,ॲन्जीओप्लरस्टी तसेच ह्रदय शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचे डॉ.भातलंवडे यांनी सांगितले.

  यावेळी डॉ.वाळुजकर यांनी ह्रदय विकाराचा झटका येण्यापूर्वी धोकादायक लक्षणे कोणती याबाबत माहिती दिली. डॉ.भोसले यांनी रोजच्या जीवनशैलीत रोजच्या आहार व व्यायामाचे महत्व सांगितले. तसेच आहार तज्ञ अनुराधा वाघमारे यांनी संतुलित आहाराचे महत्व सांगितले.

  तसेच मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत जेष्ठ नागरिकां साठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी सांगितले.

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशुतोष भातलवंडे, सागर मुटकुळे व रविंद्र गोरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: