निवडणुकीत बेकायदेशीर निधीचा वापर; फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सरकोजी यांना एक वर्षाचा तुरुंगवास


पॅरिस: फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सरकोजी यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकोजी यांनी २०१२ मध्ये पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी बेकायदेशीपणे निधी जमवला असल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सरकोजी हे भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी आढळले होते. या प्रकरणात सरकोजी याना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सन १९४५ नंतर तुरुंगवासाची शिक्षा मिळणारे ते पहिलेचे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आहेत.

सरकोजी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ठरवून देण्यात आलेल्या मर्यादेपेक्षाही अधिक रक्कम खर्च केली होती. सरकोजी यांनी २.७५ कोटी डॉलरपेक्षाही (जवळपास २०० कोटी रुपये) दुप्पट निधी खर्च केला होता. मात्र, या निवडणुकीत सरकोजी यांचा फ्रांस्वा ओलांद यांनी पराभव केला होता. सरकोजी हे २००७ ते २०१२ या कालावधीत फ्रान्सचे राष्ट्रपती होते.

जपानचे नवे पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत तरी कोण?
दरम्यान, याआधी मार्च महिन्यात, वर्ष २००७ ते २०१२ या कालावधीत राष्ट्राध्यक्षपद भूषवलेल्या ६६ वर्षीय सरकोझी यांना त्यांच्यासंबंधी खटल्यातील कायदेशीर कारवाईबाबत २०१४मध्ये वरिष्ठ मेजिस्ट्रेट यांच्याकडून बेकायदा माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली होती. ते इलेक्ट्रॉनिक ब्रेस्लेटसह स्वतःच्या घरी नजर कैदेत राहण्याची विनंती करण्यास पात्र असतील, असे न्यायालयाने म्हटले होते.

पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी संघटनांना आश्रय; पाच संघटनांकडून भारतविरोधी कारवाया

स्वत:ला पैगंबर म्हणणाऱ्या मु्ख्याध्यापिकेला मृत्यूदंडाची शिक्षा
वरिष्ठ मेजिस्ट्रेट यांना नोकरीची ऑफर

सरकोझी यांनी वरिष्ठ मेजिस्ट्रेट एजिबर्ट मोनाको यांना एका नोकरीची ऑफर देण्यात आली होती, हे सिद्ध करण्यास सरकारी पक्षाला यश आले. या ऑफरच्या बदल्यात लॉरियालच्या लिलियन बेटेनकोर्टमधून अवैध रक्कम स्वीकारण्याच्या प्रकरणातील आरोपांच्या चौकशीबाबतची गुप्त माहिती मागितली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: