तुरुंगात कैद्यांमध्ये टोळी युद्ध; १०० ठार, अनेक जखमी


क्योटो: इक्वेडोरमधील ग्वायकिल शहरातील एका तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांत दंगल उसळली. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आणि लष्करी जवानांना काही तास लागले. तुरुंगातील या हिंसक संघर्षात बॉम्ब फेकण्यात आले. त्याशिवाय गोळीबार, चाकू हल्ला ही करण्यात आला. सध्या संपूर्ण तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था लष्कराने ताब्यात घेतली आहे. तुरुंगातील दंगलीत १०० जण ठार झाल्याची माहिती आहे.

तुरुंग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘लॉस लोबोस’ आणि ‘लॉस चोनेरोस’ या दोन टोळ्यांच्या कैद्यांमध्ये ही दंगल झाली. या वेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. चाकूने हल्ले करण्यात आले. एक स्फोटही झाला. या दंगलीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दंगलीत १०० ठार झाले असून ५२ जण जखमी झाले आहेत.

…तर अमेरिकेवर गंभीर अर्थसंकट; अर्थमंत्री येलेन यांचा इशारा

प्रेमविवाह केला तरी पत्नीबाबत माहिती नव्हती ‘ही’ गोष्ट; पतीने घेतला मोठा निर्णय!
दंगल झालेल्या दोन्ही टोळ्या या अमली पदार्थाच्या तस्करीशी संबंधित आहेत. या दंगलीत काही जणांचे शीर धडावेगळे करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर, दोन पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. तुरुंगातील या हिंसाचारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तुरुंगातील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पाच तास लागले असल्याची माहिती देण्यात आली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: