डॉ.अशोक वागळे यांचा गोरगरिबाची सेवा हा एकमेव उद्देश होता- आ.बबनदादा शिंदे

डॉ.अशोक वागळे यांचा गोरगरिबाची सेवा हा एकमेव उद्देश होता- आ.बबनदादा शिंदे Dr. Ashok Wagle’s sole objective was to serve the poor – MLA Babandada Shinde

डॉ.वागळे यांना वाहिली ऑनलाईन सभेच्या माध्यमातून श्रद्धांजली,शेकडो नागरिक सहभागी

  कुर्डूवाडी/ राहुल धोका - कुर्डूवाडी शहरातील नागरिकांनी डॉ वागळे यांना नगराध्यक्ष करा असे सुचवले पण त्यांनी नम्रपणे नकार दिला.गोरगरिबा ची सेवा हा त्यांचा एकमेव उद्देश होता. रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे डॉ.वागळे पुन्हा होणे नाही असे गौरव उदगार आ. बबनदादा शिंदे यांनी यावेळी काढले .

      आ.संजयमामा शिंदे यांनी त्यांची निधनाची बातमी ही अत्यंत दुख:द होती.ते शिंदे कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते .आज प्रत्येक रोगाला वेगळे वेगळे डॉक्टर लागतात पण डॉ. वागळे यांच्या काळात यांत्रिक सामग्री कमी होती तरीही त्यांचे निदान करण्याची पद्धत अत्यंत अचूक होती. माढा करमाळा तालुका व शिंदे कुटुंबाकडून आ. संजय मामा शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली. 

    कुर्डूवाडी शहरातील रुग्णसेवेचा आदर्श डॉ अशोक वागळे यांच्या निधनानंतर युटूबच्या माध्यमातून ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते डॉ.संतोष काकडे,राजेंद्र पारखे,धनंजय डिकोळे ,वैशाली भाटे नेगंधी ,डॉ.नीलम तेलंग, आनंद पवार,दादा तरंगे यांनी ही सभा आयोजित केली होती.आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, माजी उपनगराध्यक्ष फुलचंद धोका , जनता बँकेचे संचालक सुरेश शहा,विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य डॉ.दिनेश कदम ,जगन्नाथ क्षीरसागर ,शेखर प्रभावळकर ,ज्योती कटारिया (अमेरिका)डॉ.मोहन दीक्षित,इंदुमती तेलंग,राणी सिस्टर,प्रभाकर चिंचवडकर,सुर्यकांत जाधव, अरुण कोरे,डॉ महाबल शहा,डॉ.संतोष सुर्वे , बाळासाहेब कुलकर्णी ,हनुमंत कडबाणे, अश्विनी कामत आदिनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.

 कुर्डूवाडी शहरात डॉ.वागळे यांनी दिलेली सेवा कधीही विसरू शकणार नाहीत. यावेळी अनेकांना अश्रू आवरले नाहीत.त्यांची कोरोनाच्या याकाळात आवश्यकता होती अशी भावना व्यक्त केली जात होती .या सभेत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. कुर्डुवाडीत कोरोना रुग्णालय उभारणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.  

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पारखे,आनंद पवार यांनी केले.नंदिता वागळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: