मोठी बातमी… भारतीय संघात चाललंय तरी काय, एकामागून एक दुसऱ्या खेळाडूनेही घेतली निवृत्ती


नवी दिल्ली : ४१ वर्षांनी यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील दोन खेळाडूंनी गुरुवारी (३० सप्टेंबर) निवृत्ती जाहीर केली. देशाचा सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा केला. त्यानंतर आता भारतीय संघातील खेळाडू बीरेंद्र लाक्रा यानेही हॉकीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. बीरेंद्र लाक्राने भारतीय संघासाठी २०१ सामने खेळले आहेत. बीरेंद्रच्या या निर्णयानंतर हॉकी इंडियाने ट्विट करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.

ओडिशाच्या रुरकेला येथे रहिवासी असलेल्या बीरेंद्रने सेल हॉकी अ‍ॅकॅडमीमधून आपल्या हॉकी करिअरला सुरुवात केली. आपल्याच राज्यातील दिलीप टर्कीला आपला आदर्श मानणाऱ्या लाक्राने दिलीपला पाहातच हॉकीचे धडे गिरवले. २००९ मध्ये एफआयएच (FIH) ज्युनियर विश्वचषकासाठी सिंगापूरला गेलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्याने २००७ मध्ये पहिल्यांदा कनिष्ठ संघात पदार्पण केले. कनिष्ठ स्तरावर सातत्याने आपल्या कामगिरीतून छाप पाडणाऱ्या लाक्राला अखेर वरिष्ठ संघात स्थान मिळाले.

अशी राहिली कारकीर्द
भारतीय पुरुष हॉकी संघाने २०१२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप २०१३ मध्ये रौप्य पदके जिंकली. या दोन्ही स्पर्धांमध्ये लाक्रा संघाचा महत्त्वाचा भाग होता. २०१४ मध्ये भारताने इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्या संघातही लाक्राचा सहभाग होता. याशिवाय जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो संघासोबत गेला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले होते. आता फक्त ऑलिम्पिक पदक जिंकायचे होते. यावर्षी जपानच्या राजधानीत खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचे स्वप्न पूर्ण झाले. रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये दुखापतीने ग्रस्त असल्याने तो संघाचा भाग नव्हता. २०१६ मध्ये त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑलिम्पिक खेळू शकला नाही. या दुखापतीमुळे तो आठ महिने हॉकीच्या मैदानापासून दूर राहिला होता.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: