amarinder singh : सिद्धूंविरोधात अमरिंदर सिंगांनी फोडली डरकाळी! केला मोठा पण


नवी दिल्लीः दिल्लीचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग ( amarinder singh ) आज चंदिगडला परतले. आपण काँग्रेस सोडणार आणि पण भाजपमध्ये जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे अमरिंदर सिंग हे आता नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. नव्या पक्षाबाबत समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच पुढील रणनीती तयार केली जाईल, असं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं.

चंदिगडला पोहोचलेल्या अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धूंना ( navjot singh sidhu ) लक्ष्य केलं. आगामी विधानसभा निवडणुकीत सिद्धू जिथून लढतील तिथून त्यांना जिंकू देणार नाही. सिद्धू पंजाबसाठी योग्य नेता नाही. सिद्धू यांचे काम पक्ष चालवण्याचं आहे. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचं काम सरकार चालवणं आहे. यामुळे सरकार चालवताना कुठलाही हस्तक्षेप करू नये, असा टोलाही अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंना लगावला.

Amarinder Singh: गृहमंत्री अमित शहांच्या भेटीवर कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं स्पष्टीकरण

आपल्या साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळात अनेक प्रदेशाध्यक्ष झाले. पण सिद्धूंनी आज जी परिस्थिती निर्माण केली आहे ती कधीच नव्हती, असं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं. चरणजीत सिंह चन्नी सरकारच्या निर्णयावर नाराज होऊन नवज्योत सिंग सिद्धू यांनी २८ सप्टेंबरला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. डीजीपी आणि महाधिवक्ता यांच्या नियुक्तीबाबत सिद्धू नाराज आहेत.

navjot singh sidhu : सिद्धू वठणीवर! काँग्रेस हायकमांडच्या दट्ट्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार

अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल यांचीही भेट घेतली. अनेक मुद्दे आहेत, ज्यावर डोवल यांच्याशी चर्चा झाली. पाकिस्तानमधून रोज ड्रोन येत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा केली, असं अमरिंदर सिंग म्हणाले. अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं अरिंदर सिंग यांनी आता स्पष्ट केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: