शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वर्षाला ६००० नाही, तर ३६००० रुपये मिळतील, असा करा अर्ज


हायलाइट्स:

  • पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
  • या योजनेअंतर्गत छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे.
  • वयाच्या ६० वर्षांनंतर, शेतकऱ्यांना दरमहा ३००० रुपये म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाते.

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही आधीच किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला सरकारकडून दरमहा ३००० रुपये मिळविण्याचा हक्क आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही. पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत (PM Kisan Man Dhan Yojna) शेतकऱ्यांना दरवर्षी ३६००० रुपये मिळू शकतात.

पीएफ खातेधारकांनो, आजच उरकून घ्या ‘हे’ काम; ७ लाख रुपयांचा मिळेल लाभ
तुम्हाला ३६ हजार रुपये कसे मिळतील?
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत, वयाच्या ६० वर्षांनंतर, शेतकऱ्यांना दरमहा ३००० रुपये म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाते.

१ ऑक्टोबरपासून बदलणार सहा नियम; जाणून घ्या सविस्तर
कोणतेही कागदपत्र सादर करायचं नाही
ही पेन्शन योजना केंद्र सरकारद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहा ३००० रुपयांची सुविधा दिली जाते. जर तुम्ही पीएम किसानचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकता नाही.

सोन्याचा भाव तेजीत ; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
– १८ ते ४० वयोगटातील कोणताही शेतकरी किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतो.
– यासाठी तुमच्याकडे जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असावी.
– तुम्हाला किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षांपर्यंत दरमहा ५५ ते २०० रुपयांपर्यंत मासिक योगदान द्यावे लागेल, हे शेतकऱ्याच्या वयोमानावरही अवलंबून आहे.
– वयाच्या १८ व्या वर्षी सामील झाल्यास मासिक योगदान दरमहा ५५ रुपये असेल.
– वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत सामील झाल्यास ११० रुपये दरमहा जमा करावे लागतील.
– जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी सामील होत असाल, तर तुम्हाला दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: