पाकिस्तान: पेशावरमध्ये शीख डॉक्टरची गोळ्या घालून निर्घृण हत्या
डॉ. सिंग यांच्या हत्येची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून हा दहशतवाद्यांनी हल्ला केला असावा का, याचाही तपास करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन, शीख आणि पारशी समुदायाला हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मागील काळामध्ये पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यक समुदायावर हल्ले वाढत आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या ७६ व्या सत्रादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. भारताच्या संयुक्त राष्ट्रातील प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आरोपांना उत्तर देताना हा मुद्दा उपस्थित केला होता. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यक भीतीच्या वातावरणात जगत असून सरकार पुरस्कृत दहशतवादाकडून त्यांच्या अधिकाराचे हनन होत असल्याचे स्नेहा दुबे यांनी म्हटले.