Explainer : आयपीएलच्या प्ले-ऑफचं असं आहे गणित; आठही संघांना कशी आहे संधी जाणून घ्या…


IPL 2021 : पुणे : आयपीएल २०२१ चे आता शेवटचे काही सामने शिल्लक राहिले आहेत. गुरुवारी (३० सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यासह, सर्व संघांचे ११ सामने पूर्ण होतील. त्यानंतर आयपीएल २०२१ च्या लीग स्टेजमध्ये फक्त १२ सामने शिल्लक राहतील. साखळी टप्प्यात एकूण ५६ सामने आहेत आणि त्यापैकी ४३ सामने झाले आहेत. अशा परिस्थितीत, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांमधील प्रत्येक सामना मनोरंजक होणार आहे. आतापर्यंत कोणीही अधिकृतपणे अंतिम-चारमध्ये पोहोचलेलं नाही आणि कोणताही संघ बाहेर पडलेला नाही. सर्व आठ संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

चेन्नई सुपर किंग्ज – आयपीएल २०२१च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा पहिला संघ ठरू शकतो. आतापर्यंत सीएसकेने १० सामने खेळले असून त्यापैकी आठ जिंकले आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघ १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. आज सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यास सीएसकेचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. हा संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यानुसार तो टॉप-२ मध्ये असण्याची दाट शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ११ सामने खेळले आणि आठ जिंकले आहेत. त्यांच्याकडेही १६ गुण आहेत. गत उपविजेता संघ असलेल्या दिल्लीला प्ले-ऑफमध्ये जाण्याची मोठी शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सदेखील सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हा संघही टॉप-२ मध्ये असण्याची शक्यता आहे. संघ सलग तिसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – आयपीएल २०२१ मध्ये विराट कोहलीचा संघ देखील आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. ११ पैकी सात सामने जिंकून आरसीबीचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि त्यांचा फॉर्म पाहता संघ प्लेऑफमध्ये जाण्याची खात्री आहे. बंगळुरूने गेल्या वेळी प्लेऑफही स्थान मिळवले होते.

कोलकाता नाईट रायडर्स – आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू झाल्यापासून शाहरुख खानच्या मालकीच्या या संघाचा खेळ पूर्णपणे बदलला आहे. उत्तरार्ध सुरू होण्यापूर्वी हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता, पण आता चौथ्या क्रमांकावर आहे. युकेमध्ये चारपैकी तीन सामने केकेआरने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली अंतिम-४ संघात स्थान मिळविण्यासाठी कोलकाताचा संघ उत्सुक आहे. त्यांना आता फक्त तीन सामने खेळायचे आहेत. ११ सामन्यांमधील पाच विजयांसह त्यांच्या खात्यात १० गुण आहेत. चांगल्या नेट रन रेटमुळे हा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्स – गेल्या दोन वेळचा चॅम्पियन संघ आयपीएल २०२१च्या उत्तरार्धात संघर्ष करत आहे. पंजाब किंग्जचा पराभव करण्यापूर्वी त्यांना सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. संघ अजूनही डळमळीत दिसत आहे, पण प्लेऑफ त्यांच्यापासून दूर नाही. ११ सामन्यांतील पाच विजयांसह त्यांच्याकडे १० गुण आहेत. पण उर्वरित तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला, तरच मुंबईच्या आशा कायम राहतील.

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता प्ले-ऑफमध्ये पोहोचणे शक्य होईल, असे वाटत नाही. पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सला सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगळुरूकडून पराभूत झाल्यानंतर अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. राजस्थानचे सध्या ११ सामन्यांत आठ गुण आहेत.

पंजाब किंग्ज – के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील संघही सध्या खराब कामगिरी करत आहे. सध्या पंजाबचा संघ ११ सामन्यांत आठ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. जर या संघाने त्यांच्या सर्व उर्वरित सामन्यांसाठी चांगली कामगिरी केली, तर ते प्लेऑफ गाठू शकेल. तरीही संघ तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहील. पंजाबचा संघ जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत मजल मारू शकतो.

सनरायझर्स हैदराबाद – प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे या संघाचे स्वप्न चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून असेल. या सामन्यात पराभव झाल्यास संघ थेट बाहेर पडेल. केन विल्यमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने जरी त्यांचे सर्व सामने जिंकले तरी ते चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकतील. उर्वरित सर्व सामने जिंकल्यानंतरही हैदराबादचे एकूण १२ गुण होतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: