punjab congress : पंजाबमध्ये सस्पेन्स कायम! सिद्धू-मुख्यमंत्री चन्नींमध्ये दोन तास खल, पण…


चंदिगडः पंजाब काँग्रेसमध्ये ( punjab congress ) सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी ( charanjit singh channi ) यांनी गुरुवारी नवज्योत सिंग सिद्धू ( navjot singh sidhu ) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास बैठक चालली. चंदिगडमधील पंजाब भवनमध्ये ही बैठक चालली. या बैठकीनंतर कुठलीही माहिती दिली गेली नाही. कलंकित अधिकारी आणि मंत्र्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त करत सिद्धूंनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धूंची आज दुपारी बैठक झाली. ही बैठक ६ वाजता संपली. जवळपास दोन तास ही बैठक चालली. यानंतर मुख्यमंत्री चन्नी हे ६ वाजता बैठकीतून सर्वप्रथम बाहेर पडले. मुख्यमंत्री चन्नी गेल्याच्या आर्ध्यातासानंतर सिद्धू तिथून निघाले. पण या बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत अधिकृतपणे कुठल्याही नेत्याने काहीच माहिती दिली नाही. यामुळे दोन्ही नेत्यांमधील मतभेद कायम आहेत की दूर झालेत? हे स्पष्ट झालेलं नाही.

पक्षात सर्वकाही आलबेलः भूपिंदर सिंग

दुसरीकडे, काँग्रेस नेते भूपिंदर सिंग गोरा यांनी बैठकीनंतर मोठा दावा केला आहे. पक्षात सर्व काही आलबेल आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या सर्व नेते मिळून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहेत आणि सर्व माहिती दिली जाईल, असं ते म्हणाले.

amarinder singh : सिद्धूंविरोधात अमरिंदर सिंगांनी फोडली डरकाळी! केला मोठा पण

सिद्धूंचा राजीनामा फेटाळला जाणार

नवज्योत सिंग सिद्धू यांचे मन वळवण्यासाठी पंजाबचे डीजीपी आणि एजी बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन सदस्यांची समिती आठवड्यातून दोनदा प्रमुख मुद्द्यांवर बैठक घेईल. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंग सिद्धू आणि हरीश चौधरी हे या समितीमध्ये असतील. त्याचबरोबर सिद्धू यांचा राजीनामा फेटाळला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

navjot singh sidhu : सिद्धू वठणीवर! काँग्रेस हायकमांडच्या दट्ट्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार

आयपीएस अधिकारी इकबाल प्रीत सिंग साहोटा यांची पंजाबच्या पोलिस महासंचालपदाची नियुक्ती केली गेली. त्यांच्या नियुक्तीवरून नवज्योत सिंग सिद्धू हे नाराज आहेत. फरीदकोटमध्ये गुरु ग्रंथ साहिब अवमान प्रकरणी झालेल्या घटनांच्या चौकशीसाठी तत्कालीन अकाली दलाच्या सरकारने २०१५ मध्ये समिती नेमली होती. या चौकशी समितीचे साहोटा हे प्रमुख होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: