अखेरच्या सत्रात पडझड ; गुंतवणूकदारांना बसला ५० हजार कोटींचा फटका


मुंबई : गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने आज भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स २८६ अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये ९३ अंकांची घसरण झाली. महिन्याच्या शेवटच्या सत्रात झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांना ५० हजार कोटींचा फटका बसला.

१ ऑक्टोबरपासून बदलणार सहा नियम; जाणून घ्या सविस्तर
आज सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २१ शेअर घसरणीसह बंद झाले. ज्यात एचसीएल टेक,नेस्ले , टीसीए, टाटा स्टील, रिलायन्स , मारुती, भारती एअरटेल, इन्फोसिस, एल अँड टी , इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, एसबीआय, ऍक्सिस बँक, एशियन पेंट या शेअरमध्ये घसरण झाली.

‘या’ दोन शेअर्सवर ठेवा लक्ष; गुंतवणूक केल्यास नफा कमावण्याची असेल संधी
दुसऱ्या बाजूला बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एनटीपीसी, सन फार्मा, टायटन, एचयूएल, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, डॉ रेड्डी लॅब या शेअरमध्ये वाढ झाली. आज बाजार बंद होताना सेन्सेक्स ५९१२६ अंकावर स्थिरावला. त्यात २८६.९१ अंकाची घसरण झाली. निफ्टी १७६१८.१५ अंकावर बंद झाला. त्यात ९३.१५ अंकांची घसरण झाली.चौफेर विक्रीने आज गुरुवारी (३० सप्टेंबर) सेन्सेक्स २८६ अंकांनी घसरला. बुधवारी सेन्सेक्स २५४.३३ अंकांनी घसरून ५९,४१३.२७ वर बंद झाला होता.

पीएफ खातेधारकांनो, आजच उरकून घ्या ‘हे’ काम; ७ लाख रुपयांचा मिळेल लाभ
आजच्या सत्रात स्थावर मालमत्ता, पीएसयू बँका, फार्मा या शेअरमध्ये वाढ झाली. मीडिया, मेटल, बँक , ऑटो आणि आयटी क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला. आज वायदेपूर्ती असल्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपले पोर्टफोलिओ संतुलित केले ज्यामुळे बाजारात पडझड झाल्याचे बोलले जाते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: