​air chief marshal vr chaudhari : महाराष्ट्राचा गौरव! नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी झाले हवाई दल प्रमुख, सूत्रे घेतली हाती


नवी दिल्लीः मिग-२९ या लढाऊ विमानाचे पायलट एअर चिफ मार्शल विवेक राम चौधरी ( air chief marshal vr chaudhari ) यांनी आज भारतीय हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. विवेक चौधरी हे हवाई दलाचे २७ वे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे विवेक चौधरी हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि वायू सेना पदक मिळाले आहे.

विवेक चौधरी हे १९८२ मध्ये हवाई दलात दाखल झाले. मिग-२९ या लढाऊ विमानाचे ते पायलट आहेत. आपल्या आतापर्यंतच्या ३९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कमांड आणि स्टाफच्या नेमणुका केल्या आहेत. ते हवाई दलाचे प्रमुख होण्याआधी ते उपप्रमुख (व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ ) होते.

हवाई दल प्रमुख झालेल्या विवेक आर. चौधरी यांनी यापूर्वी हवाई दल अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. गेल्या वर्षी पूर्व लडाखला लागून असलेल्या LACवर चीनशी वाद झाला होता, तेव्हा ते हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे कमांडिंग-इन-चीफ होते. त्यांच्या देखरेखीखाली हवाई दलाने पूर्व लडाखमध्ये आपले ऑपरेशन केले. एअर चीफ मार्शल विवेक आर. चौधरी यांनी गुरुवारी हवाईदल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हवाई दलाच्या सर्व जवांना एक संदेश दिला आहे. आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेची कोणत्याही स्थितीत सुरक्षा केली पाहिजे, असं ते म्हणाले.

हवाई दल प्रमुख विवेक चौधरी नांदेडचे सुपुत्र

विवेक राम चौधरी हे २९ डिसेंबर १९८२ मध्ये हवाई दलात रुजू झाले. ते नॅशनल डिफेन्स अकादमीचे (NDA) विद्यार्थी आहेत. मिग आणि सुखोई ही लढाऊ विमाने उडवण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. नांदेड जिल्ह्यात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. विवेक चौधरी यांचे कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हस्तरा या गावचे आहे. नांदेडचा सुपुत्र हवाई दल प्रमुख झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

India Afghanistan: काबूलची विमानसेवा सुरू करा, तालिबानचं भारताला पत्र

हस्तरा हे गाव सध्या प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. कारण हवाई दल प्रमुख झाल्याने विवेक चौधरी यांच्यामुळे देशभरात हस्तरा हे गाव चर्चेत आले आहे. विवेक चौधरी यांचे कुटुंब हे मूळचे शेतकरी होते. हस्तरा येथे विवेक चौधरी यांची शेती आणि घर आहे. विवेक चौधरी यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे अभियंता होते. आई मुख्याध्यापिका होत्या.

PM Poshan Scheme: मध्यान्ह भोजन आता ‘पीएम पोषण’, ११.८० कोटी विद्यार्थ्यांना लाभ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: