Anil Deshmukh Case: देशमुख प्रकरणात मोठे अपडेट्स; ‘या’ २ प्रमुख अधिकाऱ्यांना CBIने बोलावले


हायलाइट्स:

  • अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय तपासाला वेग.
  • सीताराम कुंटे, संजय पांडे यांचा जबाब नोंदवणार.
  • सीबीआय कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआय कडून आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआयने जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितल्याचे वृत्त पीटीआयने सीबीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. ( Anil Deshmukh Case Latest Breaking News )

वाचा:नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र; कारण…

सीबीआयकडून याबाबत अधिकृत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नसली तरी अनिल देशमुख प्रकरणात काही प्रश्नांची उत्तरे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांकडून अपेक्षित असून त्याअनुषंगानेच त्यांच्याकडे विचारणा केली जाणार आहे व त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने नमूद केले. सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना समन्स बजावण्यात आले आहे का?, अधिकाऱ्यांना केव्हा हजर राहण्यास सांगण्यात आले आहे?, याबाबत कोणताही तपशील या अधिकाऱ्याने दिला नाही.

वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान

दरम्यान, कुंटे आणि पांडे यांनी याआधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. आता जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात येऊन तो नोंदवावा अशी विनंती दोन्ही अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. याबाबत परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते व नंतर मुंबई हायकोर्टातही धाव घेतली होती. या आरोपाची दखल घेत कोर्टाने सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करून सीबीआयने देशमुख व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ईडीकडून तपास सुरू आहे. देशमुख यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. ईडीकडून देशमुख यांना लूकआऊट नोटीसही बजावण्यात आलेली आहे.

वाचा: छगन भुजबळ हे ‘भाई युनिव्हर्सिटी’चे प्राचार्य!; शिवसेना आमदाराचा नवा आरोप



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: