Pune Crime पुणे: पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा; विवाहित असूनही…
हायलाइट्स:
- पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप.
- लग्नाच्या आमिषाने केली तरुणीची फसवणूक.
- पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
वाचा: छगन भुजबळ हे ‘भाई युनिव्हर्सिटी’चे प्राचार्य!; शिवसेना आमदाराचा नवा आरोप
कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून संबंधित उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१८ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत विविध ठिकाणी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित उपनिरीक्षक २०१८ मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याची फिर्यादी तरुणीसोबत ओळख झाली होती. त्याने लग्नाच्या आमिषाने तरुणीशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री उशिरा कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान