Farmers Protest: पावसात धान्य शेतातच पडून, भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचं खुलं आव्हान


हायलाइट्स:

  • सरकारकडून १ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती धान्य खरेदी प्रक्रिया
  • ११ ऑक्टोबरपर्यंत पिक खरेदी प्रक्रिया पुढे ढकलली
  • सरकारकडून जाणून-बुजून उशीर : शेतकरी नेत्यांची उद्विग्न प्रतिक्रिया
  • शेतीमाल शेतातच पडून खराब होण्याची शक्यता

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना भाजप सरकारकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केलं जातंय. याच दरम्यान, धान्य खरेदीवरून पंजाब, हरयाणात नवा वाद उभा राहिला आहे. पीक खरेदीमध्ये सरकारकडून जाणून-बुजून उशीर केला जात असल्याचा आरोप करत शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी थेट हरयाणातल्या मनोहर लाल खट्टर सरकारला खुलं आव्हान दिलंय. गुरनाम सिंह यांच्या म्हणण्यानुसार, उद्यापासून (२ ऑक्टोबर) पीक खरेदी सुरू झाली नाही तर भाजप नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही, अशी घोषणाच गुरनाम सिंह यांनी केलीय.

सरकारच्या म्हणण्यानुसार, वातावरणामुळे यंदा धान्य खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात उशीर झाला आहे. केंद्र सरकारनं पंजाब, हरयाणाला एमएसपीच्या आधारावर ११ ऑक्टोबर रोजी ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

VIDEO: आंदोलनात घुसू पाहणाऱ्या काँग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
Farmers Protest: ‘भारत बंद’ दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू
Bharat Bandh: मनापासून शेतकऱ्यांसोबत, संजय राऊत यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांना पाठिंबा
एक व्हिडिओ जारी करत भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी यावर सरकारला इशारा दिला. ‘बाजारात पिकांचा ढीग पडतोय. पावसामुळे अनेक पिकं खराब झाली आहेत. सरकारकडून अगोदर १ ऑक्टोबर रोजी खरेदी सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं परंतु, आता ही तारीख ११ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे’, असं या व्हिडिओत चढूनी यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं सरकारकडून जाणून-बुजून पिक खरेदीत उशीर केला जात आहे. शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अटी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच सडून जाईल, बाजारातही त्याची विक्री होणार नाही, अशी चिंताही शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलीय.

पुन्हा एकदा इशारा देतोय. उद्यापासून खरेदी सुरू केली जावी अन्यथा परवा तुमचे आमदार, खासदार, नेत्यांना अशा पद्धतीनं घेरलं जाईल आणि घरात बंद केलं जाईल की त्यांच्या कुत्र्यांनाही घराबाहेर पडता येणार नाही. शेतकरी मित्रांनो उद्यापर्यंत वाट पाहा, खरेदी सुरू झाली नाही तर परवा यांना बाहेर पडू देऊ नका

गुरनाम सिंह चढूनी, शेतकरी नेते

शेतकरी आणि विरोधकांचा विरोध झुगारत संसदेत मोदी सरकारकडून संमत करून घेण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांना ‘काळे कायदे’ म्हणत शेतकऱ्यांकडून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला आता जवळपास १० महिने पूर्ण होत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांत चर्चा पूर्णपणे बंद आहे.

किरेन रिजिजूंचा डान्स, PM मोदींनी फिरकी घेतली…!
Manish Gupta Murder Case: यूपीत व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; योगींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट
PM Poshan Scheme: मध्यान्ह भोजन आता ‘पीएम पोषण’, ११.८० कोटी विद्यार्थ्यांना लाभSource link

Leave a Reply

Your email address will not be published.