Madhya Pradesh: बस-कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात, सात ठार


हायलाइट्स:

  • भिंड – ग्वालियर महामार्गावर भीषण अपघात
  • सात मृतांत एका महिलेचाही समावेश
  • १५ जण जखमी, रुग्णालयात दाखल

ग्वालियर : मध्य प्रदेशच्या भिंड – ग्वालियर महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडलाय. या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बस आणि कंटेनर एकमेकांना धडकल्यानंतर हा अपघात घडलाय.

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय.

Farmers Protest: पावसात धान्य शेतातच पडून, भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचं खुलं आव्हान
Himachal Pradesh: ‘खंमीगर ग्लेशिअर’मध्ये अडकून पडलेल्या ट्रेकर्सची अखेर सुटका

गोहद स्टेशनच्या डांग बिरखडी परिसराजवळ हा अपघात घडलाय. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलंय. ‘मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भिंड जिल्ह्यातील गोहद महामार्गवर झालेल्या रस्ते दुर्घटनेत जीव गमावणाऱ्या सात जणांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे. कुटुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना त्यांनी ईश्वराकडे केली आहे’, असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलंय.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघातात प्राण गमावणाऱ्या तसंच जखमींच्या कुटुंबांना योग्य मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘रेड क्रॉस’द्वारे जखमींना ५० हजार रुपयांची त्वरीत मदत पुरवण्यात येणार आहे.

खळबळजनक! IAF च्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, केली टू-फिंगर टेस्ट; संताप व्यक्त, काय आहे टू-फिंगर टेस्ट?
Manish Gupta Murder Case: यूपीत व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; योगींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: