Farmers Protest: शेतकरी आंदोलक -पोलिसांची पुन्हा धुमश्चक्री; आंदोलकांवर पाण्याचा मारा


हायलाइट्स:

  • उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा विरोध
  • पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न
  • हरयाणातल्या खट्टर सरकारविरोधात शेतकऱ्यांत तीव्र असंतोष

झज्जर, हरयाणा : हरयाणाच्या झज्जरमध्ये आज उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी अनेक शेतकरी दाखल झाले होते. या दरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री उडालेली पाहायला मिळाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला. या हिंसक घटनेनंतर हरयाणातल्या मनोहर लाल खट्टर सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. (Farmers and Police Clash In Haryana : Police Used Water Canons on Protesting Farmers)

आज सकाळीच मोठ्या संख्येत महिला आणि पुरुष आंदोलक हातात झेंडे घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळाकडे जाताना दिसून आले. परंतु, पोलिसांकडून या आंदोलकांना रोखण्यात आलं.

या घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या टँकरच्या मदतीनं आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. यानंतर आंदोलक मागे हटले नाहीत. त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला.

Farmers Protest: पावसात धान्य शेतातच पडून, भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचं खुलं आव्हान
रस्ते कायमचे कसे अडवले जाऊ शकतात?
पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेडसही उभारण्यात आली होती. परंतु, आंदोलकांनी ही बॅरीकेडसही उचलून रस्त्याच्या बाजुला फेकून दिली.

हरयाणात आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचे सगळे प्रयत्न अपुरे पडताना दिसून येत आहेत. याआधी, पीक खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय तसंच कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांकडून राज्यातील भाजप सरकारला इशारा देण्यात आला होता. उद्यापासून (२ ऑक्टोबर) खरेदी सुरू केली जावी अन्यथा परवा तुमचे आमदार, खासदार, नेत्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असं म्हणत शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी थेट हरयाणातल्या मनोहर लाल खट्टर सरकारला खुलं आव्हान दिलंय.

Monsoon Update : १९६० नंतर दुसऱ्यांदा ‘मान्सून’ उशिरा सुरू करतोय परतीचा प्रवास
PM Poshan Scheme: मध्यान्ह भोजन आता ‘पीएम पोषण’, ११.८० कोटी विद्यार्थ्यांना लाभSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: