सरकारी तिजोरीला अच्छे दिन! सप्टेंबरमध्ये ‘जीएसटी’मधून मिळाले इतके लाख कोटी


हायलाइट्स:

  • ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमधील जीएसटी संकलन १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
  • गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० च्या तुलनेत यंदा जीएसटी संकलन २३ टक्क्यांनी वाढले आहे.
  • यंदा सिक्कीममध्ये जीएसटी संकलनात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले.

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारचे कर उत्पन्न (GST Collection) वाढले आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमधील जीएसटी संकलन १.१२ लाख कोटी रुपयांवरून १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० च्या तुलनेत यंदा जीएसटी संकलन २३ टक्क्यांनी वाढून १,१७,०१० लाख कोटी रुपये झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जीएसटी संकलनात सातत्याने होणारी वाढ हे सरकार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण आहे.

एअर इंडियाच्या पंखांना टाटांचे बळ; तब्बल ६८ वर्षानंतर एअर इंडिया स्वगृही परतणार
जीएसटी संकलनाची आकडेवारी थोडक्यात पाहू –
– ऑगस्ट २०२१ मध्ये जीएसटी संकलन १,१२,०२० कोटी रुपये होते. ऑगस्ट २०२० मध्ये ते ८६,४४९ कोटी रुपये होते.

– जुलै २०२१ मध्ये १.१६ लाख कोटी होते. गेल्या वर्षी म्हणजे जुलै २०२० मध्ये जीएसटी संकलन ८७,४२२ कोटी रुपये होते.

– यंदा जून २०२१ मध्ये जीएसटी संकलन १ लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजे ९२,८४९ कोटी रुपये होते.

IPO ठरला जबरदस्त हिट ; ‘पारस डिफेन्स’च्या शेअरने केलं गुंतवणूकदारांना मालामाल
सिक्कीममध्ये सर्वाधिक वाढ
अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीपेक्षा यंदा सिक्कीममध्ये जीएसटी संकलनात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये जीएसटी संकलनात सुमारे १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी संकलन ३७७ कोटी रुपये झाले आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ३६८ कोटी रुपये होते. यंदा त्यात ३ टक्के वाढ दिसून आली आहे.

केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय; ‘पीपीएफ’सह अल्प बचतीच्या योजनांवर मिळेल इतके व्याज
दिल्लीत जीएसटी संकलन ३६०५ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते ३१४६ कोटी होते, म्हणजेच यंदा १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात यंदा जीएसटी संकलन ५६९२ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ५०७५ कोटी रुपये होते. यामध्ये १२ टक्के वाढ झाली आहे.

दुसरीकडे, बिहारमध्ये गेल्या महिन्यात जीएसटी संकलन ८७६ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ९९६ कोटी रुपये होते. यंदा त्यात १२ टक्क्यांची घट झाली. महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे सर्वाधिक जीएसटी संकलन झाले. गेल्या वर्षी १३५४६ कोटी रुपये संकलन झाले होते. त्यात यंदा २२ टक्के वाढ होऊन १६,५८४ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: