Monsoon Update : १९६० नंतर दुसऱ्यांदा ‘मान्सून’ उशिरा सुरू करतोय परतीचा प्रवास


हायलाइट्स:

  • कोकण – गोवा, मराठवाड्यात समाधानकारक पावसाची नोंद
  • सलग तिसऱ्या वर्षी देशात सामान्य पावसाची नोंद
  • उत्तर – पश्चिम भारतात ६ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होऊ शकतो

नवी दिल्ली : देशात यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाळी ऋतूत ‘सामान्य’ पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलीय. भारतीय हवामान विज्ञान विभागानं ही माहिती दिलीय.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात दक्षिणेतील राज्यांत पावसाचं कारण ठरणारा ‘पूर्वेत्तर मॉन्सून’ही यंदा सामान्य राहण्याची शक्यता आहे. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा समुद्रकिनारी भाग, रायलसीमा, केरळ, दक्षिण कर्नाटक तसंच लक्षद्वीप या भागांमध्ये सामान्य पाऊस पडू शकतो.

विभागाचे महासंचालक एम महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर – पश्चिम भारताच्या काही भागांत ६ ऑक्टोबरच्या आसपास दक्षिण – पश्चिम मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

आयएमडीच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राचे वरिष्ठ अधिकारी आर के जेनामणि यांच्या म्हणण्यानुसार, इतक्या उशिरा मान्सूनच्या प्रवासाची सुरूवात होण्याची ही १९६० नंतरची दुसरी वेळ आहे. २०१९ मध्ये उत्तर पश्चिम भारतात मान्सूननं ९ ऑक्टोबरपासूनच परतीच्या प्रवासाला सुरूवात केली होती. उत्तर पश्चिम भारतापासून ते दक्षिण पश्चिम मान्सून साधारणत: १७ सप्टेंबरपासून माघारी फिरतो.

उल्लेखनीय म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी देशात सामान्य पावसाची नोंद करण्यात आलीय. २०१९ आणि २०२० सालात ‘सामान्य’हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली होती.

दक्षिण पश्चिम मान्सून शेती प्रधान भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जातो. देशाचा जीडीपी तसंच देशातील ठिकठिकाणचे जलाशय भरण्यासाठी या पावसाचं महत्त्व निर्विवादा आहे. याच पाण्याचा वापर देशभरात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी केला जातो.

देशभरात जून महिन्यात ११० टक्के, जुलै महिन्यात ९३ टक्के तर ऑगस्ट महिन्यात ७६ टक्के पावसाची नोंद करण्यात आलीय. या महिन्यांत सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातल्या पावसाची कमतरता सप्टेंबर महिन्यात भरून निघाली. सप्टेंबरमध्ये १३५ टक्के पावसाची नोंद झालीय.

मनीष गुप्ता हत्या : रामगढताल पोलीस हद्दीत आणखी एका तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू
Madhya Pradesh: बस-कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात, सात ठार
या राज्यांत कमी पावसाची नोंद

देशात नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम उत्तर प्रदेश आणि लक्षद्वीप या भागांत नेहमीपेक्षा कमी पावसाची नोंद झालीय.

महाराष्ट्रात कोकण-मराठवाड्यात समाधानकारक पाऊस

महाराष्ट्रात कोकण – गोवा, मराठवाडा या भागांत तर राजस्थान, हरयाणा, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर मध्य कर्नाटक, पश्चिम बंगालचं गंगा क्षेत्र, अंदमान निकोबार या राज्यांत मान्सूनच्या काळात अधिक पावसाची नोंद करण्यात आलीय.

यंदा दक्षिण पश्चिम मान्सून थोड्या उशिरानं ३ जून रोजी केरळला दाखल झाला होता. १५ जूनपर्यंत तो गतीनं मध्य, पश्चिम, पूर्व, पूर्वेत्तर आणि दक्षिण भारतापर्यंत दाखल झाला.

Farmers Protest: पावसात धान्य शेतातच पडून, भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचं खुलं आव्हान
खळबळजनक! IAF च्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, केली टू-फिंगर टेस्ट; संताप व्यक्त, काय आहे टू-फिंगर टेस्ट?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: