S Jaishankar: अफगाणिस्तानसंबंधी अनेक मुद्द्यावर भारत-अमेरिकेचं मत सारखंच : परराष्ट्र मंत्री


हायलाइट्स:

  • ‘यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’चं वार्षिक संमेलन
  • ‘दहशतवादासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर’
  • नरेंद्र मोदी-जो बायडन यांच्या भेटीतही या मुद्यावर चर्चा

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील सद्य घडामोंडीवर बोलताना ‘अफगाणिस्तानसंबंधी अनेक मुद्यांवर भारत आणि अमेरिकेचं मत सारखंच आहे’, असं केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय. गुरुवारी ‘यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम‘च्या वार्षिक नेतृत्व संमेलनात ते सहभागी झाले होते. यावेळी परराष्ट्र मंत्री बोलत होते.

दहशतवादासाठी अफगाणिस्तानच्या भूमीच्या संभाव्य वापराबद्दल भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना चिंता असल्याचंही एस जयशंकर यांनी म्हटलंय.

Farmers Protest: पावसात धान्य शेतातच पडून, भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचं खुलं आव्हान
Madhya Pradesh: बस-कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात, सात ठार
अफगाणिस्तान हा एक असा मुद्दा आहे ज्यावर दोन्ही पक्षांचे अनेक विचार सारखे आहेत. तालिबान शासनाला मान्यात देण्यासंबंधी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे ‘दोहा करारा’तील समूहांद्वारे देण्यात आलेल्या वचनबद्धता पूर्ण करण्याच्या आधारावरच करण्यात यावं, असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक मुद्यांवर सिद्धांतिक स्तरावर भारत आणि अमेरिकेचे विचार समान आहेत. ‘दहशतवाद’ या मुद्याचा यात निश्चित स्वरुपात समावेश आहे. अफगाण भूमीचा दहशतवादासाठी वापर भारत, अमेरिका या दोन्ही देशांना प्रखरपणे जाणवतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीत या देखील मुद्यावर चर्चा करण्यात आली होती, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

Farmers Protest: शेतकरी आंदोलक -पोलिसांची पुन्हा धुमश्चक्री; आंदोलकांवर पाण्याचा मारा
Monsoon Update : १९६० नंतर दुसऱ्यांदा ‘मान्सून’ उशिरा सुरू करतोय परतीचा प्रवासSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: