हाॅलिडेला जाताय ; ऐन सुटीच्या हंगामात विमान प्रवास महागणार,हे आहे त्यामागचे कारण
हायलाइट्स:
- विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
- ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी जेट इंधनाच्या (एटीएफ) किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
- जेट इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे विमान तिकिटांच्या किंमतीही वाढू शकतात.
दरवाढीचा झटका ; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, जाणून घ्या आजचा दर
चार महानगरांमधील जेट इंधनाचे दर
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत जेट इंधनाची किंमत वाढून ७२,५८२.१६ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. तर कोलकातामध्ये ७६,५९०.८६ रुपये, मुंबईत ७०,८८०.३३ रुपये आणि चेन्नईमध्ये ७४,५६२.५९ रुपये प्रति किलोलीटर आहे.
नवी मुंबईच्या कंपनीचा शेअर बाजारात डंका; ‘पारस डिफेन्स’नं केलं मालामाल
हवाई प्रवास महागणार
जेट इंधनाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे हवाई प्रवास महाग होईल. प्रवासी तिकिटांबरोबरच मालवाहतुकीचे दरही वाढतील. प्रवाशांवर प्रवास भाड्याचा बोजा वाढेल आणि त्याचा परिणाम विमानातील प्रवाशांच्या संख्येवर होईल. एव्हिएशन सेक्टरमधील एअरलाईन्सचा ४० ते ५० टक्के खर्च फक्त एटीएफच्या म्हणजे जेट इंधनाच्या खरेदीवर होतो. कोरोना महामारीमुळे विमान क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशांतर्गत उड्डाणे सुरू झाली आहेत, पण आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम आहे.
सीएनजी,पाईप गॅस महागणार;अडीच वर्षानंतर केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना जोरदार झटका
पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त
१ ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. असे असूनही वाहनांसाठी वापरले जाणारे पेट्रोल-डिझेल विमानाच्या इंधनापेक्षा महाग आहे. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत १०१.६४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रति लीटर आहे, तर जेट इंधनाची किंमत ७२,५८२.१६ रुपये प्रति किलोलीटर आहे. म्हणजेच एक लिटर जेट इंधनाची किंमत ७२.५८ रुपये आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढले
जेट इंधनाव्यतिरिक्त एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC)ने १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर ४३.५ रुपयांपर्यंत वाढवली आहे. यानंतर, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १६९३ रुपयांवरून १७३६.५ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.