फेक फेसबुक अकाउंटवरून होणाऱ्या फसवणुकीबाबत पोलिसांनी केले हे आवाहन

नागरिकांना आवाहन फेक फेसबुक अकाउंट वरून होणाऱ्या फसवणुकीबाबत …

सध्या पुणे शहरातील नामवंत डॉक्टर ,वकील , व्यावसायिक , शासकीय अधिकारी / कर्मचारी व इतर नामवंत व्यक्तींचे फेक फेसबुक अकाउंट बनवुन त्यांचे फ्रेंड लिस्ट मधील मित्र – मैत्रीण तसेच नातेवाईक यांना सदर फेक फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन त्यानंतर पैशाची मागणी करीत असलेबाबत सायबर पोलिस स्टेशन येथे तकारी प्राप्त होत आहे . असे आपणासोबत घडल्यास आपण खालील प्रमाणे प्रोसेस करून सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी …- उमेश औदुंबर तावसकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सायबर पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण

• ज्यांची फेक फेसबुक प्रोफाईल बनवली आहे त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन बनवलेली फेक प्रोफाईल शोधा , स्वत:ला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट गेली आहे , त्यांच्याकडुन सदर फेक प्रोफाईलची फेसबुक लिंक (युआरएल) मागवुन घ्या .
• त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट दिसतील , त्या डॉटवर क्लिक करा . • तुमच्यासमोर Find Support or Report Profile हा ऑप्शन दिसेल , त्यावर क्लिक करा . • Pretending To be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल , त्यावर क्लिक करा . • पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील , Me , AFriend आणि Celebrity . आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा . आणि नेक्स्ट करा , फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल .

इतरांनी सदरची प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना • प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट दिसतील , त्या डॉटवर क्लिक करा . तुमच्यासमोर Find Support or Report हा ऑप्शन दिसेल , त्यावर क्लिक करा . • Fake Account हा पहिला ऑप्शन दिसेल , त्यावर क्लिक करा . • पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील , Me , AFriend आणि Celebrity . • आपण मित्राची फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी AFriend हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा , फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल .

फेसबुक प्रोफाईल सुरक्षीत कसे करावे ... 

स्वतःची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसु नये याकरीता …

Settings & Privacy – Setting – How People Can Find And Contact You → who can See Your Friend ust → तिथे Only Me करावे . • स्वत:ची फेसबुक प्रोफाईल फोटो / कव्हरपेज फोटो अनोळखी व्यक्ती copy / Download करू नये याकरीता ….. Settings & Privacy = Setting → Profile Locking → Lock Your Profile तिथे करावे .

अनोळखी व्यक्तीने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवु नये याकरीता ….

Settings & Privacy – Setting – How People can Find And Contact You → who can Send Friend Request तिथे Friend Of Friend करावे .

स्वत:चा फेसबुक अकाउंट सुरक्षीत ठेवणे करीता

Settings & Privacy → Setting – Pasword and Security → Use Two – Factor Authentication तिथे योग्य पर्याय निवडून Continue वर क्लिक करावे .

स्वतःचा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला ई -मेल आयडी कोणास दिसु नये याकरीता

. Settings & Privacy – Setting – Parsnal and Account information → contact Info . → तेथे नमूद मेल.आय.डी. वर विलक करा who can see your Email Address ? → तिथे Only Me करावे .

स्वतःचा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला मोबाईल कमांक कोणास दिसु नये याकरीता

Settings & Privacy → Setting → Parsnal and Account Information – Contact info . → तेथे नमूद मोबाईलवर क्लिक करा → who can See This Mumber ? → तिथे Only Me करावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: