VIDEO : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली सात मजली इमारत, जीवितहानी टळली


हायलाइट्स:

  • हिमाचलमधील कच्ची घाटी परिसरातील घटना
  • धोकादायक इमारत अगोदरच रिकामी करण्यात आली होती
  • प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाच्या ‘कच्ची घाटी‘ परिसरात सात मजल्यांची इमारत पाहता पाहता जमीनदोस्त होतानाचं दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालंय. सुदैवानं इमारत कोसळण्यापूर्वीच ही इमारत संपूर्णत: रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूस्खलनामुळे धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेली ही इमारत अवघ्या मिनिटात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजल्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.

वृत्तसंस्था एएनआयनं इमारत कोसळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Monsoon Update : १९६० नंतर दुसऱ्यांदा ‘मान्सून’ उशिरा सुरू करतोय परतीचा प्रवास
Madhya Pradesh: बस-कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात, सात ठार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दर्शन कॉटेज’ असं या इमारतीचं नाव होतं. पावसामुळे आणि भूस्खलनामुळे ही इमारत कमकुवत झाली होती. या इमारतीत काही कुटुंब राहत होती. मात्र, सावधानता म्हणून या कुटुंबांना दुसरीकडे हलवून इमारत रिकामी करण्यात आली होती. इमारतीच्या मलब्याखाली सापडल्यानं अनेक घराचंही नुकसान झाल्याचं समजतंय. तसंच भूस्खलनामुळे अनेक इमारतींना तडे जाऊन त्यादेखील धोकादायक बनल्या आहेत.

इमारत कोसळली त्यावेळी शिमला प्रशासन घटनास्थळीच उपस्थित होतं. उपमहापौर आणि शिमलाचे उपायुक्तही घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचले.

Farmers Protest: शेतकरी आंदोलक -पोलिसांची पुन्हा धुमश्चक्री; आंदोलकांवर पाण्याचा मारा
farmers protest supreme court : शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्ट बरसले; म्हणाले, ‘तुम्ही शहराचा गळा घोटला…’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: