कु.आदिती संजय गर्जे हिची नवोदयसाठी निवड
कु.आदिती संजय गर्जे हिची नवोदयसाठी निवड
पंढरपूर – विद्याविकास हायस्कूल उंबरे पागे ता.पंढरपूर येथील विद्यार्थ्यानी कु.आदिती संजय गर्जे हीची जवाहर नवोदय विद्यालय,पोखरापूर येथे निवड झाली.
चित्र,नृत्य,अभिनय सर्वच कलागुणांत अव्वल असणाऱ्या आदितीने, इयत्ता पहिलीपासूनच मंथन, गुरूकुल, RTSE परिक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.तिला वर्गशिक्षक व्ही.एन.लांडगे सर, तिचे वडील संजय गर्जे सर,आई सुषमा गर्जे व अनेक माजी शिक्षकांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभले.
तिचे चौथीपर्यंतचे शिक्षण उंबरे केंद्र शाळेत झाले आहे.
तिच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव ढोबळे, गटशिक्षणाधिकारी श्री नाळे,मुख्याध्यापक बी.जी. शिंदे सर,सरपंच महादेव शिंदे,ज्ञानदेव कोरके,अमर इंगळे,शहाजी मुळे, संतोष चव्हाण सर,रविंद्र हजारे सर व मँडम,बांगर सर व मँडम,बनसोडे सर, इंगोले सर,काव्या गर्जे,सोहम हेंबाडे,स्वरा हेंबाडे व केंद्रातील अनेकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.