भांग विक्री करून अर्थव्यवस्था सुधरवणार पाकिस्तान; मंत्र्याने केले शेतीचे उद्घाटन
भांग हा एक प्रकारचा मादक पदार्थ असतो. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये याचा वापर औषध म्हणून केला जातो. पाकिस्तान सरकार भांगेच्या शेतीला प्रोत्साहन देणार आहे. जेणेकरून या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवता येणे शक्य होईल. ट्वीटरवर फवाद चौधरी यांनी हा प्रकल्प सुरू होणे ही मोठी बाब असल्याचे म्हटले. पाकिस्तान कोट्यवधी डॉलरच्या भांग उद्योगात मोठी भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
पाकिस्तानी नागरिकावर लाखोंचे कर्ज
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २.७५ अब्ज डॉलरचे (जवळपास २० हजार कोटी रुपये) कर्ज घेतले असल्याचे वृत्त ऑगस्ट महिन्यात समोर आले होते. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ढासळत असून इम्रान खान सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले असल्याची टीका विरोधकांनीही केली आहे. सध्या दर पाकिस्तानी नागरिकावर एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे.