भारताचेही जशास तसे; ब्रिटिश नागरिकांना १० दिवस विलगीकरण सक्तीचे


नवी दिल्ली: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १० दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात रहावे लागणार आहे. या प्रवाशांनी करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले असले तरी त्यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रिटनने भारतासह इतर देशांच्या नागरिकांसाठी केलेल्या वादग्रस्त जाचक नियमांविरोधात भारताने प्रत्युत्तरात पावले उचलले असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ऑक्टोबरपासून ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व ब्रिटिश नागरिकांना, लसीकरण झाले असले तरी विमानतळावर उतरल्यानंतर ७२ तासांमध्ये तीन कोविड आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. आठ दिवसानंतरही त्यांना कोविड चाचणी करावी लागणार आहे. त्याशिवाय भारतात आगमन झाल्यानंतर १० दिवसांसाठी घरी अथवा मुक्कामाच्या ठिकाणी विलगीकरणात सक्तीने रहावे लागणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी मिळणार? WHO ने दिली ‘ही’ माहिती

लसीकरण प्रमाणपत्राबाबत ‘किमान निकष’ गरजेचे; ब्रिटनची भूमिका
मागील महिन्यात लागू झालेल्या प्रवास नियमांनुसार, अमेरिका, इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांतील लसीकरण झालेल्या नागरिकांना ४ ऑक्टोबरपासून ब्रिटनमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांना विलगीकरणात रहावे लागणार नाही. तर, लसीकरण झालेल्या अन्य देशांतील नागरिकांना निर्बंधाचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये १० दिवसांच्या घरातील विलगीकरणाचाही समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: