एवढ सगळ होऊन संजय मांजरेकर भानावर आले नाही; जडेजावर पुन्हा केली टीका


नवी दिल्ली: भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि टीम इंडियाकडून खेळणारा ऑलराउंडर रविंद्र जडेजा यांचे संबंध गेल्या काही वर्षात बिघडले आहेत. यामुळे संजय मांजरेकर यांना छोटी नव्हे तर मोठी किमत चुकवावी लागली आहे. यात जडेजा देखील संबंधिक प्रकरण सोडण्यास तयार नाही.

वाचा-६ चौकार आणि ६ षटकार; २० वर्षीय खेळाडू पुढे बाबर आझमने टेकले गुडघे

आता संजय मांजरेकर यांनी पुन्हा एकदा जडेजावर निशाना साधला आहे. यामुळे ते पुन्हा एकदा अडचणी येऊ शकतात. एका वेबसाईटशी बोलताना मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली. जडेजाबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्याला स्वत:च्या फलंदाजीबद्दल आत्मविश्वास नाही. जडेजाने आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ९ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याने १९व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. जडेजाच्या या खेळीमुळे सामना चेन्नईच्या बाजूने झुकला होता.

वाचा- Video : पंचांनी बाद दिलं नसतानाही सोडलं मैदान; पूनमच्या खिलाडूवृत्तीचं होतंय

मांजरेकरांना अद्याप जडेजाच्या फलंदाजीबद्दल शंका आहे. तो अन्य जलद गोलंदाजांसमोर दबावात खेळतो. जडेजाच्या फलंदाजीबद्दल मला भरवसा नाही. जी भूमिका चेन्नई संघाने जडेजाला दिली आहे. प्रत्येक सामन्यात जडेजा अशी नियमितपणे अशी कामगिरी करेल का? जडेजाने आतापर्यंत प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षल पटेल यांच्याविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली आहे. तो अन्य गोलंदाजांविरुद्ध अशी कामगिरी करेल का असा सवाल संजय मांजरेकर यांनी केला.

जडेजा नक्कीच संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलच्या या हंगामात त्याने ३३ षटकात ७ विकेट घेतल्या आहेत.

वाचा- जर्सी क्रमांक १८ भारतासाठी लकी; विराटनंतर स्मृती मंधानाने रचला इतिहास

काय आहे मांजरेकर आणि जडेजा यांच्यातील वाद

२०१९च्या वर्ल्डकपमध्ये मांजरेकरांनी सोशल मीडियावर जडेजाचा उल्लेख बिट्स आणि पिसेज क्रिकेटपटू असा केला होता. यावर जडेजा प्रचंड नाराज झाला. त्याने बीसीसीआयकडे याची तक्रार देखील केली होती. या वादाची खुप चर्चा झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने समालोचकांच्या पॅनलवरून मांजरेकरांना बाहेर केले होते. यावर चाहत्यांनी आणि माध्यमांनी बीसीसीआयवर टीका देखील केली होती. पण बोर्डाला काही फरक पडला नाही. मांजरेकरांनी लिखित स्वरुपात बीसीसीआयला स्पष्टीकरण दिले होते. पण त्याचा काही फायदा झाला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: