a youth dead in lightning strike: हृदयद्रावक! वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू; होता कामाचा पहिलाच दिवस
हायलाइट्स:
- चंद्रपूर येथे डोक्यावर वीज कोसळून एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू.
- तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी या युवकाला मृत घोषित केले.
- विशेष म्हणजे या युवकाचा आपल्या कामाचा पहिलाच दिवस होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या महसूल भवनाच्या छतावर अनिकेत हरीष चांदेकर हा युवक आपले काका संजय चांदेकर ह्यांच्या बरोबर सी सी टीव्ही केबल टाकण्याचे काम करायला गेला होता. दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. काही कळायच्या आत महसूल भवनावर काम करत असलेल्या अनिकेतच्या डोक्यावरच वीज कोसळली.
क्लिक करा आणि वाचा- मनी लाँडरिंग प्रकरण: अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोर्टाचे वॉरंट जारी
या आघाताने त्याच्या डोक्यावर जखम झाली होती व त्याचा मोबाईल सुद्धा फुटला होता. अनिकेत हा आपल्या काकांसोबत जुनोना चौक, बाबुपेठ येथे काही दिवसांपासून राहत होता. आजचा त्याच्या कामाचा पाहिलाच दिवस होता हे विशेष.
क्लिक करा आणि वाचा- स्मृती मंधानाच्या शतकी खेळीने सांगलीत जल्लोष; झाली फटाक्यांची आतषबाजी
ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी छतावर धाव घेतली. या नागरिकांनी जखमी अवस्थेतील अनिकेतला तत्काळ दवाखान्यात पाठविले. मात्र, दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
क्लिक करा आणि वाचा- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?; अजित पवार म्हणाले..