channi meets pm : पंजाबमधील गदारोळादरम्यान मुख्यमंत्री चन्नी PM मोदींना भेटले; बोलले…


नवी दिल्लीः पंजाबमधील राजकीय गदारोळात राज्याचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा सुरू करावी. तसंच करोनामुळे बंद झालेला भारत-पाकिस्तान कॉरिडॉर उघडण्याची मागणीही केली आहे. यामुळे भाविकांना तिथे जाता येत नाहीए, असं मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर म्हणाले.

पंतप्रधान मोदींसोबत अतिशय चांगल्या वातावरणात चर्चा झाली. तीन कृषी कायद्यांवरून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याची मागणी आपण त्यांच्याकडे केली. यासाठी शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा करावी, असं चरणजीत सिंग चन्नी म्हणाले.

PM मोदी म्हणाले, ‘… बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल’

पंजाबमध्ये केंद्र सरकारकडून दरवर्षी १ ऑक्टोबरपासून धान खरेदी सुरू होते. पण यंदा ही धान खरेदी १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे धान खरेदी आतापासूनच सुरू करावी, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदींकडे केल्याचं मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी सांगितलं.

shivraj singh chouhan : PM मोदींना भेटले मुख्यमंत्री चौहान, आठवड्यातला दुसरा दिल्ली दौरा

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असं अमरिंदर सिंग यांनी शहांना भेटीत म्हटलं होतं. तसंच तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि एमएसपीची हमी हे मुद्दे चर्चेत होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: