शत्रूलाही धडकी भरणार; भारतात दाखल होणार ‘इस्रायली ब्रह्मास्त्र’!


लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने आपली शस्त्रसज्जता वाढवण्यावर भर दिला आहे. भारताने इस्रायलकडून चार हेरोन मार्क-२ ड्रोन खरेदी केले आहेत. भारत याआधीपासून हेरोन ड्रोनचा वापर करत आहे. मात्र, सध्या येणारे चार ड्रोन हे अद्यावत आहेत. त्याशिवाय या ड्रोनमध्ये लेझर गाइडेड बॉम्ब आणि क्षेपणास्त्रेही बसवण्यात येऊ शकतात. भारत हे ड्रोन लडाखमध्ये तैनात करण्याची दाट शक्यता आहे. इस्रायली ड्रोन विमानांसाठी जानेवारी महिन्यात करार करण्यात आला होता. येत्या दोन ते तीन महिन्यात इस्रायलकडून दोन हेरोन मार्क-२ ड्रोन विमाने मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अन्य दोन ड्रोन विमाने या वर्षाच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे.

इस्रायलकडून भारताला ड्रोन

भारत आणि इस्रायली कंपनी आयएआय दरम्यान करार झाला आहे. चीनसोबत लडाखमध्ये तणाव वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने ही ड्रोन विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय हवाई दलाच्या प्रोजेक्ट चीता या योजनेनुसार ९० हेरोन ड्रोन घेतले जाणार आहेत. या ड्रोन विमानांमध्ये लेझर गाइडेड बॉम्ब, हवेतून जमिनीवर हल्ला करणारी क्षेपणास्त्रे, हवेतून डागली जाणारी अॅण्टी टँक क्षेपणास्त्र आहेत. भारतीय हवाई दलाकडे याआधीपासूनच इस्रायल निर्मित युएव्ही आहे. यामध्ये १०८ सर्चर आणि ६८ हेरोन आणि एक सर्विलान्स आणि हेरगिरी करणाऱ्या ड्रोनचा समावेश आहे. ही ड्रोन क्षेपणास्त्रांशिवाय आहे. त्याशिवाय इस्रायली कंपनी आयएआयने भारताला हार्पी ड्रोन दिले आहेत. घातक स्फोटके वाहून नेण्यास हे ड्रोन सक्षम आहेत.

हेरोन मार्क-२ ड्रोन किती प्रभावी?

इस्रायली कंपनी आयएआयचे सीईओ बोआज लेव्ही यांनी सांगितले की भारताने हेरोन ड्रोन बाबत समाधान व्यक्त केले आहे. इस्रायली मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हेरोन मार्क-२ ड्रोन हा जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. हे एक रणनीतिक आणि अनेक प्रकारच्या मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. या ड्रोन विमानामध्ये रोटेक्स ९१५ आयएस इंजिन आहे. त्यामुळे ड्रोन १० हजार मीटर उंचीवर जाण्यास मदत होते. या ड्रोनचा अधिकाधिक वेग १४० नॉट्स प्रतितास आहे. हे विमान ४५ तास सलगपणे हवेत राहू शकतात. हेरोन मार्क-२ विमान याआधी तयार करण्यात आलेल्या हेरोन युएव्हीचा अपडेटेड मॉडल आहे. सेंसरची क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल आपल्या हद्दीतूनच शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करण्यास सक्षम असणार आहे. हेरोन युएव्हीचा वापर इस्रायली हवाई दलाकडूनही करण्यात येतो.

पाणबुडींचा शोध घेण्यास सक्षम

हेरोन मार्क-२ ड्रोन विमानात एक सर्व्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर डेटा एकत्र करण्यास ड्रोन सक्षम आहे. ड्रोनच्या बनावटीतही बदल करण्यात आले आहेत. ड्रोन समुद्रातील लक्ष्याचाही थांगपता लावण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. हेरोन मार्क-२ ड्रोन विमान दूर अंतरापर्यंत सहजपणे देखरेख करू शकतो. या ड्रोनची सिस्टीम सॅटेलाइटच्या मदतीने बंद करता येऊ शकते. इस्रायली ड्रोनचा वापर भारत, कॅनडा, चिली, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, सिंगापूर, दक्षिण कोरिया आदी देशांकडून करण्यात येतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: