मुंबई इंडियन्सच्या कोचने केली हार्दिक पंड्याची पोल खोल, उपस्थित केले गंभीर प्रश्न


शारजाह: पुढील काही दिवसात युएईमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. स्पर्धा तोडावर आली असताना मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मुंबई आणि भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू हार्दिक पंड्याची पोल खोल केली आहे. टी-२० वर्ल्डकप संघात निवड झाल्यानंतर प्रत्येक सामन्यात हार्दिक पंड्याच्या फिटनेसवर प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यावर चर्चा सुरू आहे.

वाचा- एवढ सगळ होऊन संजय मांजरेकर भानावर आले नाही; जडेजावर पुन्हा केली टीका

आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्रातील पहिल्या काही लढतीत हार्दिक खेळू शकला नव्हता. त्यामुळे ही चर्चा आणखी वेगाने सुरू झाली. अशात हार्दिकने आतापर्यंत झालेल्या सामन्यात गोलंदाजी देखील केली नाही. त्यामुळे अनेकांनी त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात जयवर्धनेने पंड्या संदर्भात एक मोठे वक्तव्य केले असून त्याचे उत्तर बीसीसीआयला द्यावे लागणार आहे.

जयवर्धने म्हणाले, मुंबई इंडियन्स संघ हार्दिककडून गोलंदाजी करून घेणार आहे. पण त्यासाठी कोणताही घाई करणार नाही. कारण असे केले तर त्याला त्रास होऊ शकतो. याचा परिणाम आगामी टी-२० वर्ल्डकपमधील त्याच्या कामगिरीवर पडू शकतो. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दोन लढतीत हार्दिक खेळला नव्हता. त्यानंतर तो फक्त फलंदाज म्हणून भूमिका पार पाडत आहे.

वाचा- क्रिकेट न्यूजVideo : पंचांनी बाद दिलं नसतानाही सोडलं मैदान; पूनमच्या खिलाडूवृत्तीचं होतंय

टी-२० वर्ल्डकपसाठी जेव्हा भारतीय संघाची निवड झाली तेव्हा निवड समितीने हार्दिक गोलंदाजीसाठी फिट असल्याचे म्हटले होते. पण आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की जो जर फिट असेल तर आयपीएलमध्ये गोलंदाजी का करत नाही. अशात वर्ल्डकपमध्ये अचानक गोलंदाजी कशी काय करू शकले. त्याच बरोबर हार्दिक जर पूर्ण फिट नसले तर त्याला निवड समितीने संघात घेतले कसे?

अर्थात जयवर्धने यांना असे काही वाटत नाही. हार्दिक संदर्भात भारतीय संघाचे थिंक टॅक सातत्याने मुंबई इंडियन्स संघाच्या संपर्कात आहेत. त्याने मोठ्या कालावधीपासून गोलंदाजी केली नाही. त्यामुळेच त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.

वाचा- जर्सी क्रमांक १८ भारतासाठी लकी; विराटनंतर स्मृती मंधानाने रचला इतिहास

प्रत्येक दिवसाच्या मुल्यमापनावर आम्ही निर्णय घेतो की हार्दिक गोलंदाजी करणार की नाही. जर आता गोलंदाजी करण्यास आम्ही दबाव आणला तर त्याला त्रास होऊ शकतो. हार्दिकवर २०१९ साली पाठीची शस्त्रक्रिया झाली होती.

हार्दिकची कामगिरी

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात हार्दिकची कामगिरी खराब आहे. या हंगामात ९ सामन्यात १३.५७च्या सरासरीने फक्त ९५ धावा केल्या आहेत. नाबाद ४० ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. फलंदाज म्हणून तो टी-२० वर्ल्डकपसाठी फिट आहे असे दिसत नाही. तर गोलंदाज म्हणून त्याने चेंडूला हात लावला नाही. निवड समितीने टी-२० वर्ल्डकप संघात ऑलराउंडर म्हणून निवडले आहे. यामुळे एक मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

आयसीसीच्या नियमानुसार वर्ल्डकप खेळणाऱ्या प्रत्येक देशाला १० ऑक्टोबरपर्यंत संघ बदलण्याची परवानगी आहे. आता बीसीसीआय हार्दिक संदर्भात असा कोणताही निर्णय घेतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. काहींनी शार्दूल ठाकूर आणि वेंकटेश अय्यर यांना संघात घेण्याची पर्याय सुचवला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: