नवी दिल्लीः पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री
कॅप्टन अमरिंदर सिंग (
captain amarinder singh ) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. हरीश रावत यांचे दावे आणि आरोप हे अपमान करणारे आहेत, असं अरिंदर सिंग म्हणाले. कॅप्टन अमंरिदर सिंग हे कुठल्यातरी मोठ्या दबावाखाली आहेत, असं हरीश रावत म्हणाले. काँग्रेस सोडण्याच्या वक्तव्यावरून रावत यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली. ‘रावत यांचं वक्तव्य हे पक्षाची सध्याची दयनीय स्थिती स्पष्ट करणारं आहे. हा पक्ष राज्यात गेल्या साडेचार वर्षांपासून आघाडीवर होता’, असं प्रत्युत्तर अमरिंदर सिंग यांनी रावत यांच्या टीकेला दिलं.
काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबद्दल सांगितलं. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यापूर्वी आम्ही बोललो होतो. आपल्या काबामासंबंधी त्यांनी काहीही सांगितलं नाही. तसंच ४३ आमदारांनी कुठलं पत्र पाठवल्याचं आपल्या बघण्यात आलं नाही, असंही रावत बोलले होते. पण आता त्यांच्या खोटारडेपणाचं आपल्याला आश्चर्य वाटतंय, असा टोला अमरिंदर सिंग यांनी लगावला.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी सोनिया गांधींना मी राजीनामा देऊ केला होता. पण त्यांनी तो स्वीकारला नाही आणि मला काम सुरू ठेवण्यास सांगितलं होतं. सर्वांनी माझा अपमान झाल्याचं पाहिलं आहे. तरीही रावत उलट-सुलट वक्तव्य करून वेगवेगळे दावे करत आहेत. हा अपमान नाही, तर मग काय होतं, असं अमरिंदर सिंग म्हणाले.
channi meets pm : पंजाबमधील गदारोळादरम्यान मुख्यमंत्री चन्नी PM मोदींना भेटले; बोलले…
पक्षाने अपमान केला आणि चांगली वागणूक दिली नाही, अमरिंदर सिंग यांचे हे वक्तव्य सत्य नाही, असं रावत म्हणाले. पक्षात त्यांचा अपमान झाल्याचं सांगितलं जातंय. पण कायम त्यांचा सन्मान केला गेला, असं पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत म्हणाले.
shivraj singh chouhan : PM मोदींना भेटले मुख्यमंत्री चौहान, आठवड्यातला दुसरा दिल्ली दौरा