corona latest updates करोना: राज्यात आजही नव्या रुग्णांची संख्या ३ हजारांवर; मृत्यू किंचित घटले
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार १६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ५० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या ५० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७४ हजार ८९२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- अहमदनगरमधील वाढत्या रुग्णसंख्येची पुण्यातही चिंता, अजित पवारांनी दिला ‘हा’ आदेश
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत होतेय घट
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ३७१ इतकी आहे. काल ही संख्या ३६ हजार ४८४ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ०२१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार २३८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ६३७ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ९८६ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ३७७ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ८५८ आहे.
क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू; होता कामाचा पहिलाच दिवस
मुंबईत उपचार घेत आहेत ५,१८५ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार १८५ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६९३ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६६३, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८८३ इतकी खाली आली आहे.
धुळे, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४२५, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १११ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०९ वर आली आहे. तर धुळ्यात ३ आणि भंडाऱ्यात सर्वात कमी म्हणजेच २ सक्रिय रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा- मनी लाँडरिंग प्रकरण: अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोर्टाचे वॉरंट जारी
२,४२,११० व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८९ लाख १० हजार ५६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ५३ हजार ९६१ (११.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४२ हजार ११० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.