gang of robbers: दिवसा सामान्य माणूस, रात्री बनायचे दरोडेखोर, अखेर पोलिसांनी पकडलेच


अहमदनगर: दिवसभर सामान्य माणसांसारखे फिरून माहिती काढायची. त्या माहितीच्या आधारे रात्री दरोडे टाकायचे, टोळीतील सहकाऱ्यांच्या मदतीने चोरीच्या मालाची विल्हेवाट लावायची आणि पोलिसांना गुंगारा देत पुन्हा पुन्हा गुन्हे करायचे. अशा पद्धतीने अहमदनगरसह शेजारील जिल्ह्यांत उच्छाद मांडणारी दरोडेखोरांची टोळी नगर पोलिसांनी अखेर उघडकीस आणली. यातील सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Police nab a gang of robbers in Ahmednagar)

या टोळीकडून आतापर्यंत बारा गुन्हे उघडीस आले आहेत. सुमारे दहा वर्षांपासून ही टोळी कार्यरत असल्याचा संशय असून एकमेकांचे नातेवाईक असलेल्या आरोपींनी नगरसह शेजारील जिल्ह्यांता चाळीस पेक्षा जास्त गुन्हे केल्याचा अंदाज आहे. अलीकडेच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव तालुक्यात रात्री दरोडे टाकून लूटमार करण्याचे गुन्हे घडले होते. त्यातील साम्य लक्षात घेता पोलिसांनी प्रत्येक गुन्हा वेगळा विचार न करता एकत्रित विश्लेषण केले, खबरे आणि तांत्रिक साधनांची मदत घेतली. अखेर पोलिसांना यात यश आले. चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी निघालेले साथिदार पोलिसांच्या हाती लागले आणि पुढे टोळीच उघडकीस आली.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आजही नव्या रुग्णांची संख्या ३ हजारांवर; मृत्यू किंचित घटले

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. श्रीरामपूर येथे २३ सप्टेंबर रोजी विराज उदय खंडागळे यांच्या घरावर रात्री दरोडेखोरांनी हल्ला करत लूटमार केली होती. त्यामध्ये सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. दरोडेखोरांनी खंडागळे यांच्या घरातील लहान मुलाली ताब्यात घेत तिच्या गळ्याला चाकू लावत घरातील इतरांना धमकावले होते. लग्नाच्या अल्बममधील फोटो पाहून त्यात दिसणारे दागिने काढून देण्यास महिलांना धमकावले होते. अशाच पदधतीने आणखी काही गुन्हे त्या भागात घडले होते.

क्लिक करा आणि वाचा- अहमदनगरमधील वाढत्या रुग्णसंख्येची पुण्यातही चिंता, अजित पवारांनी दिला ‘हा’ आदेश

तेव्हापासून पोलिस तपास करीत होते, स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. या टोळीकडून २७ लाख रुपयाचे ४८३ ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने व १०० ग्रँम वजनाचे चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केली आहे. अजय अशोक मांडवे (रा. सलाबपूर, नेवास), प्रद्दुम सुरेश भोसले (रा. नेवासा फाटा), रामसिंग त्र्यंबक भोसले (रा. सलाबतपूर), समीर उर्फ चिंग्या राजू सय्यद (रा. नेवासा फाटा) बाळासाहेब उर्फ बयंग सुदमल काळे (रा. गेवराई) व योगेश युवराज काळे (रा. बिटकेवाडी, कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत. चोरीचा मुद्देमाल विल्हेवाट करण्याच्या प्रयत्नात असताना ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून आतापर्यंत बारा गुन्हे उघडकीस आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! वीज कोसळल्याने युवकाचा मृत्यू; होता कामाचा पहिलाच दिवस

अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, दिपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, संदीप मिटके साहेब, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार सुनील चव्हाण, सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, सोपान गोरे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, आण्णा पवार, बबन मखरे, विश्वास बेरड, विजय बेठेकर, भाऊसाहेब काळे, संदीप घोडके, दिनेश मोरे यांच्यासह स्थानिक पोलिसांचा पथकात समावेश होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: