IPLच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम धोक्यात; या खेळाडूकडे सुवर्ण संधी


शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामात आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची कामगिरी शानदार झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने सात लढती जिंकल्या असून त्याचे १४ गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना फक्त एक विजय महत्त्वाचा आहे. आरसीबीच्या या कामगिरीत सर्व खेळाडूंचा मोठा हातभार असला तरी एका खेळाडूने त्यांना मोठी मदत केली आहे. हा आता एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

वाचा- MIvs DC Match Preview: जिंका नाही तर घरी जा; प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला विजय…

आरसीबीचा जलद गोलंदाज हर्षल पटेल यांना हंगामातील पहिल्या लढतीत पाच विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या सत्रात त्याने हॅट्रिक घेतली. ३० वर्षीय हर्षलने आतापर्यंत ११ सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत. २७ धावा देत पाच विकेट ही त्याची सर्वोत्त्म कामगिरी आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या २ लढतीत त्याने ९ विकेट घेतल्या आहेत. हर्षलनंतर दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान १८ विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वाचा- पंजाब किंग्जचे धाबे दणाणले; सामन्याच्या आधी स्फोटक खेळाडूने बायो बबल सोडले

सध्याच्या परिस्थितीत हर्षल पटेलकडे पर्पल कॅप राहिल असे दिसते. पण आता हर्षलला आयपीएलमधील एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्रावोने २०१३ साली ३२ विकेट घेतल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी हर्षलला ७ विकेटची गरज आहे. आरसीबीच्या साखळी फेरीतील अजून ३ लढती शिल्लक आहेत. ते प्ले ऑफमध्ये गेल्यास हार्षल किमान ४ आणि अंतिम फेरीत केल्यास किमान ५ सामने खेळू शकतो. त्यामुळे ब्रोवोचा विक्रम मोडणे शक्य आहे.

वाचा- एवढ सगळ होऊन संजय मांजरेकर भानावर आले नाही; जडेजावर पुन्हा केली टीका

वाचा- मुंबई इंडियन्सच्या कोचने केली हार्दिक पंड्याची पोल खोल, उपस्थित केले गंभीर प्रश्न

आरसीबीकडून एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता. त्याने २०१५ साली २३ विकेट घेतल्या होत्या, हा विक्रम हर्षलने मागे टाकला आहे. हर्षल सोबत ब्रावोला देखील इतिहास घडवण्याची संधी आहे. त्याने आयपीएलच्या १४७ लढतीत १६४ विकेट घेतल्या आहेत. अजून सात विकेट मिळवल्यास तो स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज लसित मलिंगाला मागे टाकू शकतो. मलिंगाने १२२ लढतीत १७० विकेट घेतल्या आहेत. तर दिल्लीच्या अमित मिश्राने १६६ विकेट घेतल्या आहेत.

वाचा- KKR vs PBKS: पंजाबचा कोलकातावर कडकडीत विजय, मुंबई इंडियन्सला मागे टाकलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: