सोलापूर हाय फ्लायर्स राउंड टेबल 309 तर्फे बाँईज हाँस्पीटलला ऑक्सीजन काँन्सन्ट्रेटर मशीन

सोलापूर हाय फ्लायर्स राउंड टेबल 309 तर्फे बाँईज हाँस्पीटलला ऑक्सीजन काँन्सन्ट्रेटर मशीन
Solapur High Flyers Round Table 309 Tarf Baise Yespitalla Oxygen Concentrator Machine

महानगरपालिकेच्या बाँईज हाँस्पीटलला सात ऑक्सीजन काँन्सन्ट्रेटर मशीन सोलापूर हाय फ्लायर्स राउंड टेबल 309 तर्फे देण्यात आले .

सोलापूर दि .२ ( प्रतिनिधी ) सोलापूर हाय फ्लायर्स राउंड टेबल 309 या जागतिक सामाजिक संस्थेच्यावतीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या बाँईज हाँस्पीटलला सात ऑक्सीजन काँन्सन्ट्रेटर मशीन देण्यात येत आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन आशुतोष राठी यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे . रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . कोरोना पाँझेटिव्ह रुग्णांना उपचारासाठी बेडची कमतरता आहे . आँक्सीजनचा तुटवडा आहे . व्हेंटिलेटर कमी आहेत . वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे . या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी म्हणून आमच्या संस्थेने सात ऑक्सीजन काँन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे . महापालिकेच्या रुग्णालयात शहरातील गरीब तसेच दारिद्रय रेषेखालील व्यक्तींवर मोफत उपचार केले जातात . त्यामुळे महापालिकेच्या बाँईज हाँस्पीटलला या सात मशीन विनामूल्य देत आहोत असेही राठी यांनी सांगितले. रविवार 2 मे रोजी सकाळी महापौर सौ श्रीकांचना यंनम,आयुक्त पी शिवशंकर , उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडे हे सात ऑक्सीजन काँन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आले आहे .यावेळी राऊंड टेबल इंडियाचे नॅशनल कम्युनिटी सर्विस कनवेनर तरंग शहा , व्हाइस चेअरमन रोहित राठी , सचिव आशिष तापडिया , अभिजित मालाणी,राऊंड टेबल 309 चे एच टी वासुदेव बंग, भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतनभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते .

     राउंड टेबल इंडिया ही संस्था समाजातील दारिद्रय रेषेखालील गरीबांना जगभर मदत करत असते .भारतातील ८० शहरांत या संस्थेचे काम चालते.वंचित मुलांना शैक्षणिक मदत करते . अनेक शहरांत शाळा तसेच वर्गखोल्या उभ्या करून दिल्या आहेत .कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत म्हणून यंदा आरोग्य क्षेत्राला मदत करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे असेही आशुतोष राठी यांनी सांगितले .गेल्या वर्षी कोरोनामुळे लाँकडाऊन असताना राऊंड टेबल हाय फ्लयर्स 309 ह्या संस्थेच्यावतीने साडेसहा हजार गरजू व्यक्तींना भोजन दिले होते . येत्या मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील चारशे कुटुंबाना अन्नधान्य,नित्योपयोगी वस्तुंचे वाटप केले जाणार आहे .यामध्ये धान्य , साबण,सँनिटायझर आणि मास्क यांचा समावेश असेल असेही राठी यांनी सांगितले .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: