shivraj singh chouhan : PM मोदींना भेटले मुख्यमंत्री चौहान, आठवड्यातला दुसरा दिल्ली दौरा


नवी दिल्लीः भाजपने गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलल्याने इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्याची चिंता वाढली आहे. अशातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( shivraj singh chouhan ) यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. विशेष म्हणजे शिवराज सिंह चौहान यांचा एका आठवड्यातला हा दुसरा दिल्ली दौरा आहे. पंतप्रधान मोदींसोबत त्यांची एक तास चर्चा चालली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान दुसऱ्यासंदा दिल्ली भेटीवर गेले. त्यांनी पंतप्रधान मोदींची गुरुवारी भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य सरकारचे निर्णय आणि विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. गेल्या आठवड्यात शिवराज सिंह चौहान यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आर. के. सिंह यांची भेट घेतली होती.

farmers protest supreme court : शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्ट बरसले; म्हणाले, ‘तुम्ही शहराचा

मध्य प्रदेशातील करोनाच्या स्थितीवर माहिती दिली. करोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे आणि लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे, असं आपण पंतप्रधान मोदींना सांगितलं. शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. त्यांची ऊर्जा प्रेरणादायी आहे आणि त्यांचे विचार धोरण ठरवण्यास मदत करतात, असं चौहान यांनी सांगितलं. चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशात चंदनाची लागवड करता येते का? असं चौहान यांना विचारलं.

Monsoon Update : १९६० नंतर दुसऱ्यांदा ‘मान्सून’ उशिरा सुरू करतोय परतीचा प्रवास

मध्य प्रदेशात ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक

मध्य प्रदेशात खंडवा लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. जोबट, रैगांव आणि पृथ्वीपूर या विधानसभेच्या तीन मतदारसंघांची पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होईल, असं चौहान म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: