लडाखः लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे (
army chief visits forward areas in eastern ladakh ) यांनी शुक्रवारी पूर्व लडाखच्या आघाडीवरील चौक्यांना भेट दिली. चीनशी एलएसीवर दीर्घकाळ सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लष्कराच्या तयारीचा आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. भारतीय लष्कराने ट्विट करून माहिती दिली आहे. लष्कर प्रमुखांनी चौक्यांवर तैनात जवानांशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले, असं लष्कराने ट्विटमध्ये म्हटलं आहे. जनरल नरवणे यांना ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ व्या कोर्प्सच्या मुख्यालयात या क्षेत्रातील एकूण परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेची (LAC) सुरक्षेची जबाबदारी या कॉर्प्सवर आहे.
आपल्या दोन दिवसांच्या लडाख दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जनरल नरवणे यांनी सामरिकदृष्ट्या संवेदनशील रेजांग-ला परिसराला भेट दिली आणि देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी तेथील युद्ध स्मारकाच्या स्थळाला भेट दिली. लष्कर प्रमुखांनी लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्ण माथूर यांचीही भेट घेतली आणि केंद्रशासित प्रदेशातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
जनरल नरवणे यांनी पूर्व लडाखमधील अनेक आघाडीवरील भागांना भेटी दिल्या. तिथे त्यांना सद्याची सुरक्षेची स्थिती आणि ऑपरेशनल तयारीबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी जवानांशी संवाद साधला. जवानांचे धैर्य आणि मनोबल वाढवत आणि त्यांचे कौतुकही केले, असं लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं.
Navy mountaineering expedition : त्रिशूळ शिखर सर करण्यासाठी गेलेले नौदलाचे ५ जवान हिमस्खलनात बेपत्ता
सीमा विवादाला दोष देण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर भारताने गुरुवारी प्रहार केला. चिथावणीखोर वर्तन आणि एलएसीवरी जैसे थे स्थिती बदलण्याच्या चिनी सैन्याच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे या प्रदेशातील शांतता भंग झाली आहे. चीनच्या या प्रयत्नामुळे शांततेचे गंभीर नुकसान झाले, असं भारताने गुरुवारी सुनावलं.
air chief marshal vr chaudhari : महाराष्ट्राचा गौरव! नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी झाले हवाई दल प्रमुख,
Source link
Like this:
Like Loading...