६ चौकार आणि ६ षटकार; २० वर्षीय खेळाडू पुढे बाबर आझमने टेकले गुडघे


कराची : पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द झाल्यानंतर संघातील खेळाडू राष्ट्रीय टी-२० चषकात व्यस्त झाले आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, हसन अली, शोएब मलिक यांसारखे तारे या स्पर्धेचा भाग आहेत. ३० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय टी-३० चषक स्पर्धेत सेंट्रल पंजाब आणि नॉर्दर्न या संघांमधील सामन्यात धावांचा पाऊस पडला. यामध्ये नॉर्दर्न संघाने २०१ धावांचे लक्ष्य दोन चेंडू शिल्लक राखत साध्य केले. प्रथम फलंदाजी करताना बाबर आझमच्या नेतृत्वाखालील सेंट्रल पंजाब संघाने दोन गडी गमावून २०० धावा केल्या. बाबरने नाबाद १०५ धावा केल्या, पण नॉर्दन संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात २०१ धावा करत सामना जिंकला.

वाचा- Video : पंचांनी बाद दिलं नसतानाही सोडलं मैदान; पूनमच्या खिलाडूवृत्तीचं होतंय कौतुक

२० वर्षीय हैदर अली नॉर्दर्नच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद ९१ धावा केल्या आणि संघाला विजयाकडे नेले. सेंट्रल पंजाबकडे हसन अली, फहीम अशरफ, वहाब रियाज, उस्मान कादिरसारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे स्टार गोलंदाज होते, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या विजयासह नॉर्दनचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यांचे चार सामन्यात सहा गुण आहेत. दुसरीकडे, सेंट्रल पंजाबचे चार सामन्यांत चार गुण आहेत.

वाचा- INDWvsAUSW : जर्सी क्रमांक १८ भारतासाठी लकी; विराटनंतर स्मृती मंधानाने रचला इतिहास

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल पंजाबने वेगवान धावा काढल्या. अहमद शहजाद (३७) आणि बाबर आझमने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान शहजादने सोहेल तन्वीरच्या एका षटकात पाच चौकार लगावले. २० चेंडूत आठ चौकारांसह ३७ धावा करून तो मोहम्मद नवाजचा बळी ठरला. यष्टीरक्षक मोहम्मद अखलाफने दोन षटकारांसह २१ धावा केल्या, पण कर्णधार बाबरने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं. त्याने ११ चौकार आणि तीन षटकारांसह शतक झळकावले. टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे सहावे शतक आहे. शेवटच्या काही षटकांत शोएब मलिकने २१ चेंडूत चार चौकारांसह नाबाद ३१ धावा केल्या. त्यामुळे सेंट्रल पंजाबचा संघ २०० धावांपर्यंत मजल मारू शकला.

हैदरने पाडला षटकार आणि चौकारांचा पाऊस
लक्ष्याचा पाठलाग करताना नॉर्दनने ५६ धावांत दोन गडी गमावले, पण २० वर्षीय हैदर अलीने भरारी घेतली. मोहम्मद नवाजसोबत त्याने सेंट्रल पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरवात केली. नवाजने २१ चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह ४१ धावा केल्या. त्याने हैदरसोबत ८४ धावांची भागीदारी केली. त्याच्या जाण्यानंतर आसिफ अलीने १४ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या आणि संघाला विजयाच्या जवळ आणले. हैदर अलीला शतक पूर्ण करता आलं नाही. तो ५३ चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह ९१ धावांवर नाबाद राहिला. नॉर्दर्नच्या फलंदाजांनी सामन्यात ११ षटकार लगावले, तर सेंट्रल पंजाबला फक्त पाचच षटकार मारता आले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: