नांदेडमध्ये कॉफी शॉपच्या नावाखाली चालू होता भयंकर प्रकार; पोलिसांनी धाड टाकताच…


हायलाइट्स:

  • कॉफी शॉपच्या नावाखाली धक्कादायक प्रकार
  • पोलिसांनी धाड टाकताच समोर आला प्रकार
  • पाच तरुणांना केली अटक

नांदेडः नांदेड शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्या कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली आहे.या प्रकरणी पाच तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली तरुण- तरुणींना अश्लीलतेसाठी वाव देणाऱ्या कॉफी शॉपवर पोलिसांनी धाडी मारली आहे. यावेळी पाच तरुणांना व एका अल्पवयीन तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे.

वाचाः राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन; राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला

शहरात अंधाऱ्या कोठड्या करुन अल्पवयीन तरुणींसोबत अश्लील चाळे होत असल्याचा प्रकार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या निदर्शनास आला होता. कॉफी शॉपच्या मालकांकडून या तरुण- तरुणींकडून पैसे घेऊन त्यांना जागा उपलब्ध करुन दिली जात होती, अशी गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कॉफी शॉपवर धाड टाकली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या कार्यवाहीमुळे कॉफी शॉपच्या नावाने अश्लील उद्योग करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

वाचाः पुन्हा आभाळ फाटलं! औरंगाबाद शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस; नदीला पूर

विशेष म्हणजे, या कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य नव्हते. तर, बरेचसे साहित्य वापरत नसल्याचे दिसून आले. याचसोबत काही आक्षेपार्ह वस्तूही तिथे आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी शहरात अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करणारे निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.

वाचाः देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा, तर पंकजा मुंडे आजारी; चर्चेला उधाणSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: