IPL मध्ये आज द्विशतकचा इतिहास घडणार, या खेळाडूच्या नावावर होणार विक्रम
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा समावेश होतो. आज दोन ऑक्टोबर धोनीसाठी खास दिवस ठरणार आहे. कर्णधार म्हणून आज धोनी २००वी लढत खेळणार आहे. या आजपर्यंत कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. २००८ साली सुरू झालेल्या आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत चेन्नई आणि पुणे सुपर जाइंट्स या दोन संघांचे नेतृत्व केले आहे.
वाचा- पंजाब किंग्जच्या विजयाने दिल्ली कॅपिटल्सचा फायदा; मुंबई इंडियन्सची डोकेदुखी…
धोनीने आतापर्यंत १९९ सामन्यात नेतृत्व केले आहे. या काळात त्याचे विक्रम शानदार आहे. २००८ ते २०२१ या काळात धोनीने ११९ सामने जिंकले आहेत. तर ७९ सामने गमावले आहेत. आयपीएलच्या इतिहासात धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या संघाला १०० सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने चेन्नईकडून १८५ सामन्यात तर पुण्याकडून १४ सामन्यात नेतृत्व केले आहे.
वाचा- MI vs DC: आज पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात येतील का?
आयपीएलमध्ये कर्णधारपदाबाबत धोनीचा हा विक्रम अन्य कोणी नजिकच्या काळात मोडेल असे दिसत नाही. धोनीनंतर सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार विराट कोहली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून १३६ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यानंतर गौतम गंभीरचा क्रमांक लागतो. गंभीरने १२९ तर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने मुंबईचे १२६ सामन्यात नेतृत्व केले आहे.
वाचा- मुंबई इंडियन्सच्या कोचने केली हार्दिक पंड्याची पोल खोल, उपस्थित केले गंभीर प्रश्न